नाशिक : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला असून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. शिक्षकांनी पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्काराचा निकाल लांबण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत सोमवारी (दि.5) दुपारी 2 वाजता मुंबई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक संघटनेची बैठक बोलविली आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी मूल्यांकनास पात्र महाविद्यालयांना अनुदान द्यावे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, 2012 व 2013 पासूनच्या शिक्षकांना नियुक्त मान्यता व वेतन द्यावे, 2003 ते2011 पर्यंतच्या मंजूर वाढीव पदावरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता देऊन त्यांच्यासाठी वेतनाची आर्थिक तरतूद करावी, तसेच2011पासूनच्या वाढीव पदांना मंजुरी द्यावी. अशा विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीचे पेपर तपासण्यावर बहिष्कारास्त्र उपसले आहे. बारावीची परीक्षा दि.21 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून पाच प्रमुख विषयांचे पेपर होऊनही शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम हाती घेतलेले नाही. परिणामी राज्यातील लाखो विद्याथ्र्यांच्या उत्तररपत्रिका मंडळाकडे पडून राहिल्या असून, त्यांच्या सुरक्षेसह निकालाची चिंता वाढीस लागल्याने सराकने शिक्षकांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली आी होती. सरकारने या प्रश्नाकडे लक्ष देत, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. यातून काही तोडगा निघाल्यास तो विद्यार्थ्यांसह पालकांनाही दिलासा दायक ठरणार आहे.सकारात्मक विचार झाल्यास तडजोडीची भूमिकागेल्या तीन ते चार वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित असून अद्याप कोणत्याही मागणीची सरकारने दखल घेतलेली नाही. शिक्षक रस्त्यावर उतरून आंदोलने करीत असतानाही शासन याची दखल नाही. त्यामुळेच बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षकांना घ्यावा लागला आहे. सरकारने अनुदान आणि वेतनाच्या मुद्यावर सकारात्मक विचार केला तर अन्य मागण्याविषयी शिक्षक तडजोडीची भूमिका घेऊन शकतात. त्यादृष्टीने सोमवारी (दि.5) होणाऱ्या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न राहणार आहे. -प्रा. संजय शिंदे, सरचिटणीस, शिक्षक संघटना
पेपर तपासणीचा तिढा सूटण्याची शक्यता, सोमवारच्या बैठकीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 2:23 PM
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला असून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. शिक्षकांनी पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्काराचा निकाल लांबण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत सोमवारी (दि.5) दुपारी 2 वाजता मुंबई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक संघटनेची बैठक बोलविली आहे.
ठळक मुद्देबारावीच्या पेपर तपासणीवर शिक्षक संघटनेचा बहिष्कार शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंबघी सोमवारी बैठक वेतन अनुदानाविषयी सकारात्मक विचार झाल्यास तडजोडीची शक्यता