तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याकडून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दिघावकर यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्याने ते नुकतेच महाराष्ट्र पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान, या पदावर कोणाची नियुक्ती होते, याबाबत पोलीस वर्तुळात खलबते सुरू झाली आहेत. नाशिक परिक्षेत्रात अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांचाही समावेश होतो. नाशिक परिक्षेत्राची भौगोलिक सीमा अत्यंत मोठी आहे, तसेच आगामी निवडणुका लक्षात घेता, राजकीय समीकरणेही महत्त्वाची ठरणार आहेत.
२००४ सालच्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले पडवळ यांच्याकडे २०१९ साली मुंबईच्या वाहतुक शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली. २०१४ साली पडवळ यांनी नाशिकच्या अधीक्षकपदाची धुरा सांभाळली होती. सुमारे दोन वर्षे त्यांनी या पदाची धुरा सांभाळली होती. त्यांची मुंबईच्या वाहतूक शाखेत २८ एप्रिल, २०१९ रोजी त्यांची बदली करण्यात आली हाेती. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नतीने बदली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, तसेच सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याही नावाची चर्चा या पदासाठी होत आहे. शिंदे हेही २०१९ सालापासून सोलापूरचे आयुक्त आहेत.
--इन्फो--
कैसर खालीद यांचेही नाव चर्चेत
२०१९ साली रानडे यांना अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर बढती देण्यात आली. रानडे यांनीही नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात काही वर्षांपूर्वी उपायुक्त म्हणून सेवा बजावली होती. त्यांचा कार्यकाळ हा त्यावेळी चांगलाच गाजला होता. त्यामुळे त्यांचीही वर्णी लागलण्याची शक्यता आहे. १९९७ सालच्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले व सध्या मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाचे आयुक्तपदाची धुरा सांभाळणारे कैसर खालीद हेदेखील या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
------
फोटो आर वर ०५पडवळ, ०५रानडे, ०५कैसर खालिद, ०५शिंदे या नावाने सेव्ह आहेत.
===Photopath===
050521\05nsk_57_05052021_13.jpg~050521\05nsk_60_05052021_13.jpg
===Caption===
प्रवीण पडवळ, मकरंद रानडे, कैसर खालिद, अंकुश शिंदे~प्रवीण पडवळ, मकरंद रानडे, कैसर खालिद, अंकुश शिंदे