दररोज चोवीस तास सुरू राहणारे मार्केट फक्त दहा तासच सुरू राहणार असून, त्यासाठी पंचवटी मार्केट, शरदचंद्र पवार मार्केट व नाशिक रोड उपबाजारात ही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पिंगळे यांनी दिली आहे. बाजार समिती सुरू ठेवण्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी लिलाव सुरू ठेवण्याचे, त्याचबरोबर कोरोना नियमांचे पालन करण्याचे ठरविण्यात आले आहे. बाजार समितीत फक्त फळभाज्या, पालेभाज्यांचेच लिलाव करण्यात येणार असून, लिलाव घेतलेल्या व्यापाऱ्यांनी दोन तासांच्या आत पॅकिंग करून माल बाहेर घेऊन जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर रात्रीचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. असेही पिंगळे यांनी सांगितले.
चौकट===
...अशी असतील बंधने
* अडत्यांनी २५ टक्के हमालांच्या उपस्थितीत काम करावे.
* महिला हमालास प्रवेश बंद.
* शेतमाल लावताना १० फुटांचे अंतर बंधनकारक.
* शेतकऱ्यांनी शेतीमाल ठरवून दिलेल्या वेळेच्या एक तास अगोदर बाजार समितीत यावे.
* हमालांना ओळखपत्र बघूनच प्रवेश.
* पंचवटी मार्केटमध्ये सकाळी भरणारा किरकोळ भाजीपाला, वजनकाटा लावून विक्री करण्यास पूर्णपणे बंद.
-------
...असा होईल लिलाव
* फळभाज्यांचा लिलाव सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत.
* गाजर, वाटाणा, आले, मिरची लिलाव दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत.
* पालेभाज्यांचा लिलाव सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत.