सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडांगळी येथील उपबाजारात बुधवारपासून (दि. २१) सोयाबीन, मका व धान्य भुसार या शेतमालाच्या लिलावाचा शुभारंभ सभापती विनायक तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.वडांगळी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आपला धान्यभुसार शेतमाल बाजार समितीच्या आवारातच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती तांबे व उपसभापती सुधाकर शिंदे यांच्यासह संचालक मंडळाने केले.वडांगळी येथील उपबाजारात पहिल्याच दिवशी सोयाबीन या शेतमालाला ३ हजार ३३५ रुपये, मक्याला १ हजार ४५१ रुपये तर गहू या शेतमालाला २ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव शेतकºयाला मिळाला. यावेळी लिलावात विजय वाघ, अनंत चांडक, दिलीप ठेंगे, मनोज सूर्यवंशी, पुंडलिक गुंजाळ, सुनील महाले आदी व्यापाºयांनी भाग घेतला.याप्रसंगी समितीचे संचालक विनायक घुमरे, रवींद्र पगार, संजय खैरनार, शांताराम कोकाटे, पंढरीनाथ खैरनार, सोपान उगले, भारत बोºहाडे, रामदास खुळे, विनायक खुळे, राजेंद्र खुळे आदी उपस्थित होते.बाजार समितीचे सचिव विजय विखे, उपसचिव आर.एन. जाधव, लिपिक व्ही.आर. उगले यांनी लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पाडली.सोयाबीन, मका व धान्यभुसार शेतमालाबाबत भविष्यात भावांतर योजना महाराष्ट्र शासनाने लागू केल्यास त्याच्या तफावतीचा फरक हा त्याच शेतकºयांना घेता येणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच व्यापाºयांनी खरेदी केलेल्या सोयाबीन, मका व इतर शेतमालाची रक्कम शेतकºयांना २४ तासांचे आत रोख स्वरूपात अदा करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वडांगळी उपबाजारात शेतमाल लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:54 PM
सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडांगळी येथील उपबाजारात बुधवारपासून (दि. २१) सोयाबीन, मका व धान्य भुसार या शेतमालाच्या लिलावाचा शुभारंभ सभापती विनायक तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये समाधान : पहिल्याच दिवशी सोयाबीनला तीन हजार रुपये भाव