येवला : येवला कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवारात तसेच अंदरसुल उपबाजार व पाटोदा उपबाजार आवारात हंगाम सन २०१९-२० साठी मका व भुसार धान्याचे लिलाव सुरु झालेले आहे. मकास बाजार समितीमध्ये चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी आपला मका व इतर भुसारधान्य शेतीमाल बाजार समितीतच विक्री करावा असे आवाहन बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांनी केले आहे.येवला मुख्य आवारासह उपबाजार अंदरसुल व पाटोदा येथे मका व भुसारधान्य लिलाव सुरु झाल्यामुळे अंदरसुल व पाटोदा गावांतील व परिसरातील शेतक-यांची जवळच्या ठिकाणी मका व भुसारधान्य विक्र ीची चांगली सोय झाली आहे.येवला मुख्य आवारात शुक्र वारी (दि.२२) मक्यास १७३६ इतका उच्चतम भाव मिळाला असून सरासरी भाव १५५० प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच शेतीमालाचे रोख पेमेंट मिळत असुन शिवार व खेडा खरेदीतुन होणारी वजनातील फसवणुक टाळली जात आहे.उपबाजार अंदरसुल येथे आठवडयातुन सोमवार, मंगळवार, बुधवार व शुक्र वार, शनिवार असे पाच दिवस तर पाटोदा येथे आठवडयातुन सोमवार ते शनिवार असे सहा दिवस लिलाव चालु असल्याने अंदरसुल व पाटोदा परिसरातील शेतकरी बांधवांनी आपला मका व इतर भुसारधान्य वाळवुन व स्वच्छ करु न विक्र ीस आणावे. व कुणीही खेडोपाडी खरेदी करणाऱ्या खाजगी व्यापाऱ्यांना भाव भरुन मकाची विक्री करु नये. कारण वजनात तसेच बाजारभावात व पेमेंटबाबत फसवणूक होण्याची शक्यता आहे.तसेच शासनाने मकास १७५० रुपये इतका हमीभाव जाहिर केलेला असून शासनाने हमीभाव व शेतकºयांना मिळणारा भाव यामधील फरक किंवा अनुदान योजना जाहिर केल्यास अनुदानापासुन कुणीही वंचित राहू नये याकरीता आपला शेतीमाल बाजार समिती मध्येच विक्र ी करावा असे आवाहन बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे, उपसभापती गणपत कांदळकर, अंदरसुल उपसमितीचे सभापती मकरंद सोनवणे व पाटोदा उपसमितीचे सभापती मोहन शेलार, प्र. सचिव के. आर. व्यापारे व संचालक मंडळाने केले आहे.
येवला बाजार समिती आवारात मका, भुसार धान्याचे लिलाव सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 7:04 PM
येवला : येवला कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवारात तसेच अंदरसुल उपबाजार व पाटोदा उपबाजार आवारात हंगाम सन २०१९-२० साठी मका व भुसार धान्याचे लिलाव सुरु झालेले आहे. मकास बाजार समितीमध्ये चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी आपला मका व इतर भुसारधान्य शेतीमाल बाजार समितीतच विक्री करावा असे आवाहन बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांनी केले आहे.
ठळक मुद्देमका व भुसारधान्य विक्र ीची चांगली सोय