सातपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अंबड औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या बहुमजली गाळे प्रकल्पातील (फ्लॅटेड बिल्डिंग) गाळ्यांचा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी लिलाव करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लघु उद्योजकांचे स्वत:च्या गाळ्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. महामंडळाने लिलावाची रीतसर कार्यवाही पूर्ण केली आहे. मात्र लिलाव न करता योग्य दरात गरजू उद्योजकांना गाळे मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.अंबड औद्योगिक वसाहतीतील १४ हजार ८५० चौरस मीटर भूखंडावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बहुमजली गाळे प्रकल्प (फ्लॅटेड बिल्डिंग) उभारला आहे. तीन मजली असलेल्या या प्रकल्पात प्रत्येक मजल्यावर ६९ याप्रमाणे २०७ गाळे बांधण्यात आलेले आहेत. इमारत पूर्ण झाली असून, त्यातील गाळ्यांचे वाटप एक दोन दिवसांत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जे लघु उद्योग भाड्याच्या जागेत आपला उद्योग चालवीत आहेत. त्यांच्यासाठी हे गाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या २०७ गाळ्यांपैकी १५ गाळे वाणिज्य वापरासाठी आहेत, तर माजी सैनिक, अपंग, महिला, एससी, एसटी यांच्यासाठी ६० गाळे राखीव ठेवण्यात आले आहेत. हे गाळे लवकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.ही मागणी आता पूर्णत्वास येणार आहे. मात्र गाळे वाटप करताना त्रासदायक अटी शर्थी नसाव्यात अशीही अपेक्षा उद्योजकांची आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी लिलाव करण्यात येणार आहे.जे लघुउद्योजक भाड्याच्या जागेत आपला व्यवसाय करीत आहेत. त्यांनाच हे गाळे प्राधान्याने वाटप केले जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून उद्योग सुरू पाहिजे. पोट भाडेकरी म्हणून करारनामा, आयकर विवरण पत्र आणि २५ लाखांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल आवश्यक आहे. गाळा ताब्यात घेतल्यानंतर पाच वर्षे गाळा हस्तांतरित करता येणार नाही. अशा अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अंबड औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या बहुमजली गाळे प्रकल्पातील (फ्लॅटेड बिल्डिंग) गाळ्यांच्या वाटपाची प्रक्रि या एक दोन दिवसांत सुरू केली जाणार आहे. अनेक दिवसांपासूनची उद्योजकांची मागणी पूर्णत्वास येणार आहे. महामंडळाच्या अटी-शर्थीनुसार गाळे वाटप करण्यात येणार आहेत.- हेमांगी पाटील, प्रादेशिक अधिकारी,एमआयडीसी, नाशिक
एमआयडीसीतील गाळ्यांचा आचारसंहितेपूर्वी लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 1:41 AM