मालेगाव : केंद्र शासनाच्या साठवणूक निर्बंध निर्णयाच्या विरोधात मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील लिलाव सोमवारी ठप्प झाले होते. व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद ठेवून केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
मुंगसे कांदा विक्री खरेदी केंद्रावर दररोज ४०० ते ५०० वाहनांमधून कांदा विक्रीला येत असतो सध्या पाच ते सहा हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे तर इतर वेळी सात ते आठ हजार क्विंटल पर्यंत कांद्याची आवक होत असते कांद्याला सध्या चांगला दर मिळत असल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहेत मात्र केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी बेमुदत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ऐन सणासुदीच्या काळात मार्केट बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे