मालेगाव : मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील कांदा व्यापारी शिवाजी सूर्यवंशी व त्यांची पत्नी सुरेखा सूर्यवंशी यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा सोमवारी (दि. १३) लिलाव केला जाणार आहे.कसमादे परिसरातील कांदा उत्पादकांचे कांदा विक्रीपोटीचे पैसे सूर्यवंशी यांच्याकडे अडकले आहे. दोन कोटी ९० लाख ५४ हजार २६४ रुपयांसाठी सूर्यवंशी यांच्या मालमत्तेची विक्री करून शेतकºयांचे थकीत पैसे अदा केले जाणार आहेत. याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सूर्यवंशी यांचे वाहन (एमएच ४१ व्ही ७४१०) तसेच मुंगसे येथील गट क्रमांक ९१/१ मधील ०.७३ आर क्षेत्र, गट क्रमांक ९१/२ मधील ०.७३ आर क्षेत्र, गट क्रमांक ११२/१ मधील ०.३६.५० आर क्षेत्र शासन जमा आहे. त्या मालमत्तेचा सोमवारी लिलाव केला जाणार आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी १५ हजार रुपये रोख भरावे लागणार आहे. खरेदीदाराला बोली केलेल्या रकमेच्या २५ टक्के रक्कम तात्काळ दोन तासात अनामत रक्कम म्हणून भरावी लागणार आहे.तसेच खरेदीदाराकडून उर्वरित ७५ टक्के रक्कम मंजूर केलेल्या तारखेच्या १५ दिवसांच्या आत भरावी लागणार आहे.
कांदा व्यापाऱ्याच्या मालमत्तेचा उद्या लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:52 AM