नाशिक- शहरातील पंचवटी भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याऐवजी तो पेठरोवडील शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समितीत भरवण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे गर्दी टळली आहे.
पंचवटीत जिल्हा भरातून शेतकरी येत असल्याने याठिकाणी गर्दी होत असते. त्यावर उपाय म्हणून सहकार खात्याने पंचवटीतील पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बुधवारी (दि.२५) या बाजार समितीच्या आवारात लिलाव झाले. सकाळी सहा ते दुपारी दोन या वेळेत एकुण २ हजार ५३५ क्विंटल तर ५७० क्विंटल फळांची आवक झाली.
दरम्यान, मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्यात घट झाली आहे. बुधवारी मुंबईला तीन, ठाण्यास दोन, कल्याणला दोन तर पालघरला एक ट्रक या प्रमाणे भाजीपाला पाठविण्यात आला आहे