अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या दहा ट्रॅक्टरांना तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी रंगेहात पकडले होते. दंड भरण्यासाठी वेळोवेळी नोटीस बजावूनही रक्कम न भरल्याने तहसीलदार इंगळे पाटील यांनी आता जप्त केलेली ट्रॅक्टर लिलावात काढली आहेत.
शासनाच्या अटी व शर्ती यास आधीन राहून १५ मार्च रोजी तहसील कार्यालय बागलाण येथे सकाळी ११ वाजता जाहीर लिलाव होणार असून, त्याबाबतची सविस्तर माहिती नायब तहसीलदार यांच्या जवळ उपलब्ध आहे. तहसीलदारांनी राकेश सोनवणे, रोहन सोनवणे रा.सटाणा, विलास मोरे रा. म्हसदी ता.साक्री, ४) सुनील मोतीराम जाधव रा. पिळकोस, रामा पवार रा.सटाणा, राजेंद्र सुमरसिंग परदेशी रा.मुल्हेर, सागर जाधव रा.ठेंगोडा, रवींद्र भवान पवार रा.आराई, जयेश गुंजाळ रा. म्हसदी, ता.साक्री, भुषण आहेर रा. लोहणेर यांना प्रत्येकी १ लाख ३१ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण १३ लाख १५ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.
फोटो- ०५ सटाणा ऑक्शन
===Photopath===
050321\05nsk_20_05032021_13.jpg
===Caption===
फोटो- ०५ सटाणा ऑक्शन