येवला : लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांच्या व्यवहाराची तपासणी प्राप्तिकर विभागाने केल्याचे पडसाद लासलगाव येथे उमटले असले तरी येवला बाजार समितीत मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. नेहमीप्रमाणे व्यापारी लिलावात सहभागी झाले होते. बुधवारी, (दि. १४) कांद्याचे बाजारभाव किमान १ हजार ५०० ते कमाल ५ हजार २७५ तर सरासरी ४ हजार रूपये राहिले. गुरूवारी, (दि. १५) किमान १ हजार १०० ते कमाल ५ हजार ७५ तर सरासरी ४ हजार रूपये राहिले. कांदा दराने तीन हजारांचा टप्पा ओलांडताच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी घोषित केले होती. तर कांदा दराने ४ हजार ८०० रूपयांचा दर ओलांडल्याने कांदा भावाची तेजी लक्षात घेऊन आयकर विभागाने कांदा व्यापाऱ्यांना लक्ष्य केले. भाव नियंत्रित ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभागाने लासलगाव येथील कांदा निर्यातदार व्यापाºयांची तपासणी केल्याची व्यापारीवर्गात चर्चा आहे. कांद्याचे बाजारभाव वाढले की, शासन दर नियंत्रणासाठी प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून व्यापारीवर्गावर दबाव निर्माण करते. त्यामुळे व्यापारी बाजारात खरेदी कमी करतो मग बाजारभावही कमी होतात, अशीही प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
येवल्यात लिलाव सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 9:37 PM
येवला : लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांच्या व्यवहाराची तपासणी प्राप्तिकर विभागाने केल्याचे पडसाद लासलगाव येथे उमटले असले तरी येवला बाजार समितीत मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. नेहमीप्रमाणे व्यापारी लिलावात सहभागी झाले होते.
ठळक मुद्देदर नियंत्रणासाठी प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून व्यापारीवर्गावर दबाव