-----------------
विंचूरदळवी येथील गायीची चोरी
सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी येथील अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीची जर्शी गाय चोरून नेल्याची घटना घडली. राहुल बाळासाहेब शेळके (२४) यांची काळ्या रंगाची सफेद पट्टे असलेली जर्शी गाय घरासमोर बांधलेली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्री सदर गायी चोरून नेली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हवालदार पगारे अधिक तपास करीत आहेत.
---------------
जनसेवा संस्थेच्या माध्यमातून गरजूंना अन्नधान्य किट
सिन्नर: तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गावातील दानशूर व्यक्ती, माजी सरपंच बाळासाहेब काकड यांच्या आर्थिक मदतीतून कोरोनात मृत्यू पावलेल्या कुटुंबांचे वारस आणि गरजू अशा २५ कुटुंबांना अन्नधान्याच्या बारा वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी जनसेवा संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर, उपाध्यक्ष अभियंता मुकुंदराव काकड, बबन काकड, अर्जुन आव्हाड, वसंत आव्हाड, शेखर काकड, सचिन आव्हाड, शंकर आमले उपस्थित होते.