नाशिक : कांदा व्यापाºयांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाºयांनी लिलाव बंद पाडल्याने निर्माण झालेली कोंडी फोडण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत व्यापाºयांनी सोमवारपासून (दि. १८) लिलाव सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.जिल्ह्यातील बंद पडलेल्या कांदा लिलावाची कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी रविवारी कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकाºयांसह शेतकरी व व्यापाºयांची एकत्रित बैठक घेतली. यावेळी व्यापारी आणि शेतकºयांनी आयकर विभागाने बड्या कांदा व्यापाºयांवर छापे टाकून कांद्याचे भाव पाडण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप केला. आयकर विभागाच्या छाप्यांमुळे मोठ्या व्यापाºयांवर कांदा खरेदी करण्यासाठी मर्यादा आल्याने कांद्याचे भाव घसरल्याचे सांगत व्यापाºयांनी साठवणूक मर्यादेच्या नियमाच्या अंमलबजावणीलाही विरोध केला. व्यापाºयांनी चढत्या दराने कांदा खरेदी केल्यानंतर साठवणुकीवर मर्यादा आणल्यास मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करतानाच सरकारने अशी बंदी तत्काळ लागू करू नये, अशी मागणीही व्यापाºयांनी यावेळी केली. तसेच अनेक लहान व्यापाºयांकडे साठवणूक क्षमता कमी असल्याने त्यांना लिलावात सोमवारपासून सहभागी होणे शक्य होणार नसल्याने असे व्यापारी एक-दोन दिवसात लिलावात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी शेतकºयांनाही एक-दोन दिवसांच्या अंतराने कांदा बाजारात आणण्याचे आवाहन केले. मात्र बाजारात पडून असलेल्या कांद्याचे लिलाव तत्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिले. यावेळी जिल्ह्णातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव व चेअरमन बैठकीसाठी उपस्थित होते.कांद्याचे भाव व्यापारी नव्हे, तर निसर्ग आणि शासकीय धोरण निश्चित करीत असते. सरकारकडून कांद्याचे भाव वाढत असताना ते नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न होतात. परंतु, भाव कोसळल्यास कोणतीही यंत्रणा हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळेच कांदा बाजारात सरकारने हस्तक्षेप करू नये.- सोहनलाल भंडारी, जिल्हा कांदा व्यापारी संघटना, नाशिकव्यापाºयांच्या सर्व शंका व समस्यांचे निरसन करण्यात आले असून, त्यांना सोमवारपासून लिलाव सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्णातील सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू होणार असून, सर्व व्यापाºयांनी त्यात सहभाही व्हावे.- बी. राधाकृष्णन्, जिल्हाधिकारी, नाशिक
जिल्ह्यात आजपासून लिलाव पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:37 AM