सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडांगळी उपबाजारात सभापती विनायक तांबे यांच्या हस्ते मका, सोयाबीन व इतर धान्य भुसार शेतमालाच्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. वडांगळी उपबाजार येथे यापुढे दर सोमवार ते शुक्र वार असे सलग पाच दिवस मका, सोयाबीन व इतर धान्य भुसार शेतमालाचे लिलाव सुरू राहतील. लिलावाच्या शुभारंभप्रसंगी वडांगळी उपबाजार आवारात २५ वाहनातून विविध धान्य भुसार शेतमालाची आवक झाली. संजय ठोक या शेतकऱ्याच्या सोयाबीन शेतमालास जास्तीत जास्त ३८५५ रुपये असा बाजारभाव अनंत चांडक या व्यापाºयाने दिला. दीपक शिरोळे या शेतकºयाच्या मका शेतमालास जास्तीत जास्त १६८५ रुपये असा बाजारभाव दिलीप ठेंगे या व्यापाºयाने दिला. मुन्ना शेख या शेतकºयाच्या गव्हाला जास्तीत जास्त २१११ रुपये असा बाजारभाव सूर्यकांत वाघ या व्यापाºयाने दिला. मका या शेतमालास १६५० व सोयाबीन या शेतमालास ३७५० व गहू या शेतमालास २१०० रुपये असे सरासरी दर राहिले. शेतकऱ्यांनी वडांगळी उपबाजार आवारात मका, सोयाबीन व इतर धान्य भुसार शेतमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती विनायक तांबे व उपसभापती सुधाकर शिंदे यांनी केले. आपला मका, सोयाबीन व इतर धान्य भुसार शेतमाल प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा व शेतमालाची रक्कम व्यापाºयाकडून रोख स्वरूपात त्वरित लिलावाच्या दिवशीच शेतकºयांनी संबंधित व्यापाºयाकडून ताब्यात घ्यावी, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी संचालक शांताराम कोकाटे, रामदास खुळे, गंगा घुले, बाळासाहेब ठोक, योगेश कोकाटे, दगू कांदळकर, कचरू खुळे, बाजार समितीचे सचिव विजय विखे, उपसचिव आर. एन. जाधव, लिपिक व्ही.आर. उगले आदींसह शेतकरी उपस्थित होते.
वडांगळी उपबाजारात शेतमाल लिलावास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:50 PM