नाशिक : रम्य सायंकाळ, घुंगरांची किणकिण, सादर हाते असलेली आकर्षक नृत्ये, निसर्गकवितांचा आविष्कार, श्रवणीय संगीत या साऱ्यांमुळे प्रेक्षक भारावून गेले होते. निमित्त होते ‘गुरुपौर्णिमा उत्सवाचे’. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.१८) सायंकाळी नृत्यांगण कथ्थकनृत्य संस्थेतर्फे हा कार्यक्रम पार पडला. दीपप्रज्वलन व गुरुवंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला.‘लाभले आम्हास भाग्य बालतो मराठी’ या गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांची ’या हो सूर्यनारायणा’ ही कविता सादर करण्यात आली. ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे’ ही कविता छोट्या विद्यार्थिनींनी नृत्याद्वारे सादर केली. ज्येष्ठ नृत्यांगना कीर्ती भवाळकर व त्यांच्या विद्यार्थिनींनी सुरेख गीतांवर नृत्य सादर केले. त्यांनतर चिमुकल्यांनी ‘कालिका कशा गं बाई फुलल्या’, ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ या काव्यरचना रसिकांसमोर उलगडवण्यात आल्या. शंकर रामाणी यांची ‘माझिया दारात चिमण्या आल्या’पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या आवाजातील कवितेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘उंच उंच माझा झोका’, ‘संथ वाहते कृष्णामाई’, ‘सुंदर साजिरा श्रावण आला’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी’, ‘सरीवर सरी आल्या गं’ आदी गिते यावेळी सादर झाली. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.प्रचिती भावे, विशाखा अस्वले, क्षमा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. गाणी, निसर्ग कविता, मुलींचा पदन्यास याने रसिक श्रोते तल्लीन झाले होते.द्वितीय सत्रात सायली मोहाडीकर दिग्दर्शित ‘नर्तन गणेश’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी ‘गुरुब्रह्मा’, ‘वक्रतुंड महाकाय’, ‘आला रे गणपती’, ‘प्रणम्य शिरसा देवम’, ‘हे गजवंदन वक्रतुंड महाकाय’, ‘तुझ्या कांतीसम’ आदी गिते सादर झाली. ‘हे गजवंदना गौरी नंदना’, ‘जय गणेश नर्तन करी’ ही गाणी रसिकांना भावली. ‘शंकर वंदना’, ‘त्रिताला’ने कार्यक्रमाची सांगता झाली.
नृत्य-गाण्यांमध्ये प्रेक्षक दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:37 AM
रम्य सायंकाळ, घुंगरांची किणकिण, सादर हाते असलेली आकर्षक नृत्ये, निसर्गकवितांचा आविष्कार, श्रवणीय संगीत या साऱ्यांमुळे प्रेक्षक भारावून गेले होते. निमित्त होते ‘गुरुपौर्णिमा उत्सवाचे’. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.१८) सायंकाळी नृत्यांगण कथ्थकनृत्य संस्थेतर्फे हा कार्यक्रम पार पडला.
ठळक मुद्देगुरुपौर्णिमा : कविता, गाणी, नृत्यांची मेजवानी