विजय मोरे,नाशिक.नाशिक - अंध व दिव्यांग व्यक्तींना नामवंत लेखकांचे साहित्य, कथा, कादंबऱ्या, ग्रंथ यांचा आस्वाद घेता यावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सोळा ठिकाणी आॅडीओ लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे या आॅडीओ लायब्ररीमुळे शैक्षणिक साहित्य तसेच एमपीएससी अभ्यासक्रमाची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे़
आमदार बच्चू कडू यांनी शहरातील अंध, अपंग व दिव्यांगांसाठी निधीची तरतूद करावी, या मागणीसाठी तत्कालीन महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर या दोघांमध्ये वादावादीही झाली होती़ यानंतर शहरातील अंध-अपंगांना शिक्षणाची सोय करण्यासाठी १६ ठिकाणी आॅडीओ लायब्ररी तयार करण्यात आल्या आहेत़ तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी २० कोटी रुपयांच्या निधीचा आराखडाही तयार केला आहे़
या निधीतूनच या आॅडीओ लायब्ररीची सुविधा पुरविण्यात आल्या असून, अंध विद्यार्थ्यांना या केंद्रामधून शैक्षणिक सीडी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत़ याबरोबरच या प्रत्येक केंद्रावर २०० आॅडीओ सीडी उपलब्ध करून दिल्या आहेत़ या आॅडीओ लायब्ररीचा अंधांकडू चांगला उपयोग केला जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे़समाजातील अंध व दिव्यांगांना लाभ१ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नाशिक महानगरपालिकेने अंध व दिव्यांग व्यक्तींसाठी आॅडीओ लायब्ररीचे साहित्य उपलब्ध करून दिले़ मान्यवर लेखकांची पुस्तके, ग्रंथ, साहित्य हे आॅडीओ स्वरूपात असलेल्या २०० सीडी कॅसेट आहेत़ याचा लाभ समाजातील अंध व दिव्यांग नियमितपणे करतात़
आॅडीओ लायब्ररी असलेली ग्रंथालये* अण्णासाहेब मुरकुटे अभ्यासिका, नवीन पंडित कॉलनी़* बाळ गणेश फाउंडेशन, पंडित कॉलनी़* माई लेले विकास विद्यालय, गंगापूर रोड़* एनएफबीएम अंधासाठी व्यवसाय केंद्र, कृषीनगर* राष्ट्रमाता जिजाऊ वाचनालय, भद्रकाली* शासकीय अंधशाळा, नाशिक पुणे रोड* समर्थ अभ्यासिका, गंगापूर रोड* नागरिक अभिनव वाचनालय, देवी चौक, नाशिकरोड* महापालिका सार्वजनिक वाचलनालय, नाशिकरोड* नॅब, एमआयडीसी सातपूर* लोकमान्य वाचनालय, मेरी* सार्वजनिक वाचनालय, म्हसरूळ* सार्वजनिक वाचनालय, मखमलाबाद* डॉ़ फडके वाचनालय, खुटवडनगर* शिल्पकार भालेराव वाचनालय, जाणता राजा कॉलनी, पंचवटी* सार्वजनिक वाचनालय, हनुमानवाडी, पंचवटी़