भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेनंतर नाशिक महापालिकेच्या इमारतीला आग लागली. राज्यातील महापालिका आणि नगरपालिका इमारतींचे फायर ऑडिट महत्त्वाचे आहे. त्यामुळे यासंदर्भात नगरविकास मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. नाशिक महापालिकेत आग लागण्याची घटना दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. मात्र आयुक्तांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. - उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
कोट..
महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आणि दुसरीकडे ही घटना घडली. या इमारतीचे फायर ऑडिट झाले आहे. तरीही आग लागणे आश्चर्यकारक असले तरी शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
- देवयानी फरांदे, आमदार
कोट...
महापालिकेत आगीची दुर्घटना घडली असली तरी आग वेळीच आटाेक्यात आल्याने अडचण नाही; मात्र आग का लागली, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने समिती नियुक्त केली आहे. त्यात आग नक्की कशामुळे लागली, हे स्पष्ट हेाईल. त्यातून आवश्यक त्या उपाययोजना राजीव गांधी भवन आणि अन्य इमारतींत करण्यात येतील.
- सतीश कुलकर्णी, महापौर
....कोट..
आग वेळीच आटोक्यात आली हे खरे असले तरी यानिमित्ताने महापालिकेचे फायर ऑडिट हे कागदोपत्री नव्हते ना, असा प्रश्न निर्माण होतो. केवळ हाच नव्हे तर राज्यातील अन्य महापालिका वास्तूंमध्येदेखील फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्याची आणि तपासण्याची गरज आहे.
- अजय बेारस्ते, विरोधी पक्ष नेता, महापालिका
....इन्फो....
महापालिकेच्या मुख्यालयात आग लागल्याचे कळल्यानंतर इमारतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांची येथे गर्दी झाली. मात्र, अग्निशमन दलाने कर्मचाऱ्यांना त्या भागातून अन्यत्र पाठवल्याने गर्दी टळली.
इन्फो...
अन्यथा, मोठी दुर्घटना घडली असती
महापालिकेच्या इमारतीत सकाळपासूनच गर्दी असते. सुमारे चारशे ते पाचशे अधिकारी कर्मचारी या इमारतीत असतात. अनेकदा नागरिकांना प्रवेश नसला तरी ठेकेदार, राजकीय पक्षाचे नेते, नगरसेवक यांचाही सकाळपासूनच राबता असतो. मात्र, सकाळी अशा प्रसंगात तत्काळ आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्न केल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत न होता सर्व सोपस्कार पार पडले. विशेष म्हणजे पेस्ट कंट्रोलमुळे अगाेदरच कर्मचारी बाहेर काढल्यामुळे सर्वच बचावले.