नाशिक : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या सहकार विभागाच्या लेखा परीक्षणास अनुपस्थित राहिलेल्या सहकारी संस्थांना पुन्हा एक संधी देण्यासाठी सहकार विभागाने पुढील शनिवारी (दि. १९) आढावा सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांनी दिली.शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आॅक्टोबर महिन्यात दि. १४ ते १६ दरम्यान जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे वार्षिक लेखा परीक्षण करण्यात आले; मात्र या लेखा परीक्षणास काही कारणास्तव अनुपस्थित राहिलेल्या सहकारी संस्थांना पुन्हा एक संधी देण्यासाठी शनिवारी दि. १९ डिसेंबर रोजी आढावा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या जुन्या इमारतीत या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आढावा सभेत सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजे दरम्यान जिल्हास्तरीय नागरी सहकारी बॅँका / पगारदार सहकारी पतसंस्था / नागरी /ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांचाआढावा घेण्यात येईल. दुपारी एक ते चार दरम्यान जिल्हास्तरीय पणन सहकारी संस्था / इतर प्रकारच्या सहकारी संस्था / औद्योगिक सहकारी संस्था / संघीय सहकारी संस्था आणि बेरोजगार सहकारी संस्थांचा आढावा घेण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)दह्याणे येथे कामगाराचा अकस्मात मृत्यूसोग्रस : चांदवड तालुक्यातील दह्याणे येथील सागर डिस्टिलरिज कंपनीच्या कामगार वसाहतीमधील घरात नागपूर येथील युवकाचा मृतदेह आढळून आला. श्यामराव सदबा वाकडे (४५) रा. जेलरोड, नाशिक हा युवक मूळचा नागपूर येथील असून, तो सध्या चांदवड तालुक्यातील दह्याणे येथील सागर कंपनीत कामास आला होता. तो कामगार वसाहतीतील खोलीत मृतावस्थेत आढळला. यासंदर्भात वडाळीभोई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक सी.बी. इमले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भोये तपास करीत आहेत. वाकडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. (वार्ताहर)
सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण
By admin | Published: December 03, 2015 10:30 PM