खरे तर कडक निर्बंध लादण्यापूर्वी तीन चार दिवस अगोदर नागरिकांना सूचना द्यावयास हवी होती. मात्र अशा प्रकारच्या कडक निर्बंधाची खरे तर फार पूर्वीच काटेकोर अंमलबजावणी करावयास हवी होती. नाशिक जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी हे गरजेचेच होते. आजही शहरात बेड मिळत नाहीत ही वास्तवता ओळखून सरकारला सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख शिवसेना
------
यापूर्वी ८ वाजता घोषणा होऊन रात्री १२ पासून त्याची अंमलबजावणी केली गेल्याचे उदाहरण ताजे आहे. त्यामानाने दोन दिवस अगोदर नागरिकांना पूर्वसूचना देण्यात आली. त्यामुळे फक्त किराणा, भाजीपाला खरेदीसाठीच लोक बाहेर पडले होते. मात्र त्यांच्यासाठी घरपोच सेवेचा पर्याय खुला असल्यामुळे त्यांनी गर्दी करणे चुकीचे आहे.
- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी
-----
मुळात लाॅकडाऊन करायची खरोखरच गरज होती काय हाच प्रश्न आहे. दोन आठवड्यापूर्वी सहा ते साडेसहा हजार रूग्ण सापडत असताना तेव्हा प्रशासन हातावर हात धरून बसले होते. आता काहीशी संख्या कमी झाल्याने असा निर्णय घेणे म्हणजे उशिरा सुचलेेले शहाणपण आहे. गेल्या दीड वर्षापासून गोरगरीब उपासमारीचा सामना करीत आहेत त्यांचा विचार होणे गरजेचे होते.
- दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष मनसे
-------
लोकांची आपली जबाबदारी ओळखली तर शासनाला असा निर्णय घेण्याची गरज भासणार नाही. कडक निर्बंधाबाबत पॅनिक होऊन लोकांनी गर्दी केली. मुळात सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत त्यांना घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाची शासनाला काळजी आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखावी.
- शरद आहेर, शहराध्यक्ष काँग्रेस
-------
लॉकडाऊन करण्याची ही वेळ योग्य होती काय? जे लोक हातावर पोट भरतात त्यांच्यासाठी शासनाने जे पॅकेज घोेषित केले त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने अगोदर केलेल्या घोषणांची पूर्तता करावयास हवी होती.
- गिरीश पालवे, शहराध्यक्ष भाजप
-----------
(सर्वांचे फोटो वापरावेत)