मालेगाव मध्य : शहरातील पोलिस दलाचे कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून संरक्षण व्हावे यासाठी महेफुझ कॉलनी व बेस्ट आय.टी.यांच्या संयुक्तपणे स्वयंचलित सॅनिटायझर यंत्र जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह यांना सुपुर्द करण्यात आले.यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित होते.मालेगाव शहरात दररोज कोरोना बाधीत रु ग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. यामुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरु पाहत आहे.कोरोना विरु द्ध लढ्यात यशस्वीतेसाठी आरोग्य,महसुल व पोलीस दल सुक्ष्म नियोजन करून अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्याअनुषंगाने शहरात स्थानिक पोलीस कर्मचारी व्यतिरिक्त एकुण चार राज्य राखीव दलाच्या तुकड्या,चार उप विभागीय पोलीस अधिकारी, ४० अधिकारी व बीड, जालना, जळगाव,धुळेसह नाशिक येथुन ६०० पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहे. या पोलीस कर्मचाºयांना कोरोना बाधित रु ग्ण आढळून आल्याने प्रतिबंधक परिसरात ते जीवाची पर्वा न करता अहोरात्र पहारा देत आहेत. पोलीस गणवेश अर्धबाहीचे शर्ट असल्याने निम्म्यापेक्षा जास्त हात उघडाच असतो.त्यातच विनाकारण फिरणाºयांना दंडुक्याचा प्रसाद दिला जातो, मात्र नंतर याच लाठीला वेळोवेळी पोलीस कर्मचाºयांच्या हाताचा स्पर्श होतो. यापासुन त्यांच्याही जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. याची जाणीव झाल्याने बेस्ट आय. टी.संचालक साजीद अन्सारी यांच्या संकल्पनेतून कुसुंबा रस्त्यावरील महेफुझ कॉलनी परिसरात तरु णांनी संयुक्तपणे कोरोनापासुन पोलीस कर्मचा-याच्या संरक्षणार्थ स्वयंचलित सॅनिटायझर यंत्र भेट दिले.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणार्थ स्वयंचलित सॅनिटायझर यंत्र भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 8:40 PM