इगतपुरी : येथील रेल्वेस्थानकाजवळील अपयार्ड परिसरात उभ्या असलेल्या रेल दुर्घटना सहायता राहत गाडीच्या एका डब्याला अचानक शुक्रवारी (दि.९) दुपारी ३ वाजेच्या दरम्यान आग लागली. रेल्वे प्रशासनाला सदर घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर तब्बल तीन तासांनी आग आटोक्यात आली.
शुक्रवारी दुपारी ३ वाजेदरम्यान इगतपुरी रेल्वेस्थानकाजवळील यार्डात रेल दुर्घटना सहायता राहत गाडीच्या तिसऱ्या डब्याला अचानक आग लागली. यावेळी डब्यात ज्वलनशील ऑक्सिजन सिलिंडरचे सौम्य प्रकारचे स्फोट झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या डब्यात पेट्रोमॅक्स, हायड्रो इन्स्टिमेंट, ओएची सामग्री असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या घटनेची माहिती महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या अग्निशमन दलाचे हरिष चौबे व सहकारी यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. तसेच नाशिक येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. सदर घटनेमुळे रेल्वेच्या वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या वेळी पाच डबे असलेल्या रेल दुर्घटना सहायता राहत गाडीचे डबे इंजिनपासून वेगळे करण्यात आले होते. सदर आग विझवण्यासाठी जवळपास तीन ते चार पाण्याचे बंब लागले.
फोटो- ०९ इगतपुरी रेल्वे-३
इगतपुरी येथील रेल्वे यार्ड परिसरात उभ्या असलेल्या रेल दुर्घटना सहायता राहत गाडीच्या डब्याला लागलेली आग विझवताना अग्निशामक दलाचे कर्मचारी.
090721\09nsk_28_09072021_13.jpg
फोटो- ०९ इगतपुरी रेल्वे-३इगतपुरी येथील रेल्वे यार्ड परिसरात उभ्या असलेल्या रेल दुर्घटना सहायता राहत गाडीच्या डब्याला लागलेली आग विझवताना अग्निशामक दलाचे कर्मचारी.