नाशिक : क्रीडा साधना, क्रीडा संस्कृती, डी एस. एफ. आणि कालिका देवी मंदिर यांच्यावतीने ऑलिम्पिकदिनी नाशिकच्या काळाराम मंदिर ते कालिका देवी मंदिर या मार्गावर क्रीडा ज्योतीचे मार्गक्रमण करून साजरा करण्यात आला. सप्ताहात झालेल्या कॅरम स्पर्धेतील दोन गटांमध्ये अवधूत, नयन, भूषण, अनुष्का यांनी बाजी मारली.
या ऑलिम्पिक सप्ताहांतर्गत आयोजित तलवारबाजी या खेळावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. तर स्पर्धकांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, लाइन जम्प रोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, तसेच मुला, मुलींच्या दोन गटात कॅरम स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात मुलांच्या लहान गटात अवधूत आव्हाडने प्रथम तर शुभम राठोड दुसरा आणि मुलींमध्ये नयन आव्हाड प्रथम तर सारिका पवार व्दितीय स्थानी राहिली. मुलांमध्ये मोठ्या गटात भूषण भटाटेने पहिला तर नकुल चावरेने दुसरा तर मुलींमध्ये अनुष्का विसपुतेने प्रथम तर अनुष्का डोरलेने व्दितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेसाठी उमेश सेनभक्त आणि अभिषेक मोहिते यांनी पंच प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. या क्रीडा सप्ताहातील उपक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी उदय खरे, राजू शिंदे, सुदाम सूर्यवंशी, अविनाश ढोली, शशांक वझे, दीपक निकम, कुणाल अहिरे, चिन्मय देशपांडे, मनोज खैरनार यांनी परिश्रम घेतले.