वरखेडा:दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी येथे दुर्मिळ सायाळ आढळले वरखेडा दिडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी शिवारात आज सकाळी येथील ग्रामस्थांना सायाळ नावाचा दुर्मिळ प्राणी आढळून आला.त्यास ग्रामस्थांनी वनविभाग अधिकाº्यांकडे सुपुर्द केल.े आज सकाळी येथील पाणी वापर संस्थेचे सचिव रमेश कोलमाले राजेंद्र सिसोदिया हे पाटाला पाणी सुटलेले असल्याने पाणी करण्यासाठी कादवा म्हाळुंगी सी ग्रॅम कंपनीच्या भिंतीलगत गेले होते. तेथे त्यांना सायाळ आढळून आले. त्यांनी याबाबतची माहिती येथील पोलीस पाटील अर्चना अनवट यांना दिली. त्यांनी वनविभागाचे कर्मचाº्यांची दूरध्वनीवर संपर्क साधून याबाबत माहिती दिली. वनविभागाचे वनपाल वैभव गायकवाड वनरक्षक सागर वाकचौरे यांनी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थ एकनाथ अनवट गोकुळ आहेर यांच्या मदतीने सदर सायाळला वनविभागाच्या सुपूर्द केली आहे हे सायाळ पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जंगलातून याठिकाणी आले असावे अशी शक्यता वनविभागाच्या कर्मचार्यांनी बोलून दाखवली आहे.(२८वरखेडा सायाळ)
कादवा म्हाळुंगी येथे आढळा सायाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 5:23 PM
वरखेडा:दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी येथे दुर्मिळ सायाळ आढळले वरखेडा दिडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी शिवारात आज सकाळी येथील ग्रामस्थांना सायाळ नावाचा दुर्मिळ प्राणी आढळून आला.
ठळक मुद्दे हे सायाळ पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जंगलातून याठिकाणी आले असावे अशी शक्यता वनविभागाच्या कर्मचार्यांनी बोलून दाखवली आहे.