शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

पदवीधरसाठी सरासरी ५४ टक्के मतदान

By admin | Published: February 04, 2017 12:51 AM

सोमवारी मतमोजणी : जिल्ह्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; मनमाडला बोगस मतदान झाल्याची भाजपाची तक्रार

  नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात शुक्रवारी विभागात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सरासरी ५४ टक्के इतके मतदान झाले. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांनी लावलेल्या बूथमुळे आचारसंहिता भंग होत असल्याच्या तक्रारी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी केल्यामुळे काहीकाळ राजकीय तणावही निर्माण झाला. मनमाडमनमाड येथील मतदान केंद्रावर ५९.४७ टक्के मतदान झाले. किरकोळ शाब्दिक चकमकी वगळता मतदान शांततेत पार पडले. एका मतदाराच्या नावावर बोगस मतदान झाले असल्याची तक्रार भाजपाकडून करण्यात आली आहे.दिवसभरात १०१८ मतदारांपैकी ६५९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राबाहेर कॉँग्रेस, भाजपा व माकपच्या उमेदवारांचे बूथ लावण्यात आले होते. दुपारी बारा वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान झाल्याने सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह चांगला दिसून आला. दुपारी एका मतदाराच्या नावावर आधीच कुणीतरी मतदान करून गेले असल्याचे निदर्शनास आल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.ब्राह्मणगावनाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत ५१.८९ टक्के मतदान झाले. ब्राह्मणगाव बूथवर एकूण ५५३ मतदान. त्यात ४५८ पुरुष, ९५ महिला मतदार होते. त्यात एकूण २८७ मतदान झाले. त्यात २५४ पुरुष ३३ महिला मतदारांचे मतदान झाले. याप्रसंगी जी. इन. सद्गीर, राजेश थोरात, एच. बी. निकम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मतदानासाठी मतदारांनी दुपारी २ वाजता गर्दी केली होती, मतदान शांततेत पार पडले.पेठपदवीधर विधान परिषद मतदार संघासाठी पेठ व करंजाळी या दोन केंद्रांवर आज शांततेत मतदान प्रक्रि या पार पडली. करंजाळी येथे २११ पुरु ष व २० महिला अशा २३१ मतदारांनी हक्क बजावला. करंजाळीला ७२.८७ टक्के मतदान झाले. तर पेठ केंद्रावर ३१२ पुरुष व ४८ महिला अशा ३६० मतदारांनी मतदान केले. एकूण ५८.५३ टक्के मतदान झाले.त्र्यंबकेश्वरमतदानासाठी आज सकाळपासूनच मतदानाला प्रारंभ झाला. येथील नूतन त्र्यंबक विद्यालयाच्या खोली क्र. १ मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ३६३ मतदारांपैकी २५२ पदवीधर मतदारांनी भाग घेतला. त्यामध्ये सायंकाळी ४ पर्यंत ६९.५२ टक्के मतदान झाले. पुरुष मतदारांमध्ये उत्साह चांगल्या प्रकारे दिसून आला. त्यामानाने महिलांमध्ये उत्साह कमी दिसत होता.त्र्यंबकेश्वरच्या मतदान केंद्रात सकाळपासून ते दुपारी १.१५ पर्यंत मतदानाचा वेग कमी होता. यावेळी अवघे ३६.४२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मात्र मतदानाचा वेग वाढलेला दिसला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत २५२ मतदान झाले. यामध्ये १८८ पुरुष पदवीधर मतदार व ६४ महिला पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्र्यंबकेश्वर येथे एकूण ३६३ मतदारांपैकी २५२ मतदान झाले. हरसूल येथे एकूण २०९ मतदारांपैकी १४९ मतदान झाले म्हणजे हरसूल येथे ७१.२९ टक्के मतदान झाले. १४९ पैकी १४२ पुरुष पदवीधर मतदार व सात महिला पदवीधरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पोलीस बंदोबस्त कडक असल्याने बाहेरच्या पत्रकारांना फोटो काढण्यास मनाई केली होती.येवलानाशिक पदवीधर मतदारसंघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत येवल्यात ७० टक्के मतदान झाले. येवला तालुक्यात चार मतदान केंद्रे होती.सकाळच्या प्रहरातच येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या दोन्हीही मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसले. मतदान केंद्राबाहेर डॉ. सुधीर तांबे व डॉ. प्रशांत पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आपापले पेंडॉल टाकून पदवीधर मतदारांना हात जोडत असल्याचे चित्र दिसले. नगरसूल आणि जळगावनेऊर येथील दोन्हीही मतदान केंद्रांवर प्रत्येकी ५५ टक्के मतदान झाले.येवल्यात पदवीधर नसलेल्या अनेकांनी पदवीधरांच्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर रस घेतल्याचे दिसत होते. मतदानासाठी नैमित्तिक रजा देण्याची योजना असल्याने शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे दिसत होते. दिंडोरीपदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दिंडोरी तालुक्यातून ६० टक्के मतदान शांततेत झाले. दिंडोरी येथील जनता विद्यालयात तालुक्यातील चार मतदान केंद्रांतून १०९३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे डॉ. सुधीर तांबे व भाजपाचे डॉ. प्रशांत पाटील यांच्या समर्थकांनी बूथ लावले होते. तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.सिन्नरनाशिक विभागाच्या पदवीधर मतदार संघासाठी सिन्नर शहरासह तालुक्यात नऊ मतदान केंद्रांवर सरासरी ५४.०८ टक्के मतदान झाले. ५ हजार २४० मतदारांपैकी २ हजार ८३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. नाशिक विभागाच्या पदवीधर मतदार संघासाठी सिन्नर तहसील कार्यालयात तीन, तर ग्रामीण भागात सहा असे नऊ मतदान केंद्र होते. शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान सुरू होते. दुपारी दोन वाजेनंतर मतदानाचा वेग वाढला. सिन्नर तालुक्यातील झालेले मतदान पुढीलप्रमाणे. कंसात एकूण मतदान. सिन्नर १- २६८ (५४७), सिन्नर २- ८१७ (१२८५), सिन्नर ३- ४६५ (८३१), पांढुर्ली २२३ (५११), नांदूरशिंगोटे ४०२(६८७), डुबेरे १७७ (३६१), वावी- १९७ (३३८), शहा- १४९ (३३०), देवपूर-१६६ (३५०).निफाडनिफाड तालुक्यात एकूण ५१ टक्के मतदान झाले. तालुक्यात एकूण सात हजार एकशे अठरा मतदारांपैकी तीन हजार सहाशे वीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नऊ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. केंद्राधिष्ठित झालेले मतदान- लासलगाव ८५७, निफाड ६९३, देवगाव १३५, नांदूरमध्यमेश्वर १५९, चांदोरी २९१, सायखेडा २८२, पिंपळगाव, ७१०, ओझर ४९३.चांदवडपदवीधर मतदारसंघात चार मतदान केंद्रांवर २०८५ पैकी १४२८ मतदारांनी मतदान केले. ६९८.४८ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत गुरव यांनी दिली. चांदवड प्रशासकीय इमारतीतील मतदान केंद्र क्रमांक २६० वर ४८४ पैकी ३९७ , २६१ वर ६२५ पैकी ४४० मतदान झाले, तर मतदार केंद्र क्रमांक २६२ दुगाव येथे ५१५ पैकी २९६, मतदान केंद्र क्रमांक २६३ वडाळीभोई येथे ४६१ पैकी २९५ असे मतदान झाले. शहरात डॉ. सुधीर तांबे, डॉ. प्रशांत पाटील व अन्य उमेदवाराचे मतदान बूथ प्रशासकीय इमारतीच्या बाहेर लागले होते. चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.लासलगावमतदान केंद्र क्र मांक २६५ एकूण मतदान १३३४, स्त्री ४१८, पुरुष ९१६, रानवड मतदान केंद्र क्र मांक २६४ एकूण मतदान ५९५, स्त्री १३२, पुरु ष ४६३ असे मतदार आहे.