येवला : तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी आमदार दराडे बंधू गटाचे दिनेश आव्हाड यांची तर व्हा. चेअरमनपदी राष्ट्रवादी कॉँग्रेस नेते अॅड. माणिकराव शिंदे गटाचे भागुजी महाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. येथील सहायक निबंधक कार्यालयात सहायक निबंधक ए.पी. पाटील यांच्या अध्यतेखाली विशेष सभा संपन्न झाली. सभेत चेअरमन व व्हा. चेअरमन यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. वेगवेगळ्या पक्षाचे स्थानिक नेते मंडळी एकत्र येऊन दोन वर्षापूर्वी संघाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. संस्थेचे संचालक मंडळ संस्थेच्या प्रगतीकरिता कार्यरत आहे याचा नेतेमंडळींना अभिमान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेस जेष्ठ नेते अॅड. माणकिराव शिंदे यांनी या निवडीप्रसंगी केले. यावेळी आमदार किशोर दराडे, सेना नेते संभाजी पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगरसेवक प्रविण बनकर, राजेंद्र लोणारी, नितिन काबरा, संजय कासार, डॉ. सुधीर वैद्य, भास्करराव कोंढरे ,अरूण काळे, सहकार आधिकारी विजय बोरसे, रविंद्र जाधव, योगेश उगलमुगले आदि उपस्थीत होते. या निवडीचा कृषी उत्पन बाजार समिती कार्यालयात जेष्ठ नेते अॅड. माणीकराव शिंदे, आमदार किशोर दराडे, सहकार नेते आंबादास बनकर , सेनानेते संभाजी पवार यांच्यात गुप्तगू होउन नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या काही क्षण अगोदर चेअरमनपदी दिनेश आव्हाड, व्हा.चेअरमनपदी भागुजी महाले यांची नाव निश्चिती झाली. त्यानंतर नुतन पदाधिकाऱ्यांची नावे सुचित केल्यावर निवड प्रक्रि येला सहाय्यक निबंधक कार्यालयात सुरु वात झाली. या प्रसंगी भागुनाथ उशीर, नाना शेळके, राजेंद्र गायकवाड, जनार्दन खिल्लारे, शिवाजी धनगे, त्र्यंबक सोमासे, भास्कर येवले, दगडू टर्ले, संतोष लभडे, अनिल सोनवणे, दत्ता आहेर, आशाताई वैद्य, मिराताई पवार, जगन्नाथ बोराडे, उदयान पंडित, सुरेश कदम, रघुनाथ पानसरे, दत्तात्रय वैदय, रामदास पवार, व्यवस्थापक बाबा जाधव, नंदू भोरकडे, संतोष खकाळे, रमेश वाघ, लक्ष्मण घुगे, परसराम दराडे, लहानु हवालदार, शिवाजी आव्हाड, जगन मुंढे, समाधान चव्हाण, नारायण गुंजाळ, निवृत्ती ठोंबरे, रावसाहेब बढे,भावराव जिरे, किरण महाले आदि उपस्थित होते.
येवला खरेदी-विक्र ी संघाच्या चेअरमनपदी आव्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:55 AM