नाशिकरोड : चिनी बनावटीच्या वस्तू वापरू नये, त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुरुवारी जेलरोड येथील महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी जनजागृती रॅली काढली होती. महिला महाविद्यालयापासून निघालेली रॅली दत्तमंदिर चौक, बिटको, जेलरोडमार्गे पुन्हा महिला महाविद्यालयात विसर्जित झाली. त्यानंतर भाजपाचे राजेश आढाव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय विद्यार्थी परिषदेचे नाशिकरोड शहर मंत्री मदुरा लाले, जिल्हा संयोजक अमोल आहिरे, मिहिर महाजन, प्रसाद जोशी, अक्षदा जोशी, प्राची चंद्रमोरे, श्रद्धा गायकवाड, छाया हांडे आदींसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
चिनी वस्तूंच्या विरोधात अभाविपची रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:02 AM