शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

विंचूरच्या एटीएमला महिनाभरापासून टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 11:25 PM

अपुरा कर्मचारी वर्ग, ग्राहकांची खोळंबलेली कामे अन् बँकांचा मनमानीपणा यामुळे येथील बँक खातेदार अक्षरश: वैतागले आहेत. येथे राष्ट्रीयीकृत स्टेट बँक व बॅँक आॅफ बडोदाचे एटीएम जवळपास महिना दीड महिन्यापासून कुलूपबंद असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

विंचूर : अपुरा कर्मचारी वर्ग, ग्राहकांची खोळंबलेली कामे अन् बँकांचा मनमानीपणा यामुळेयेथील बँक खातेदार अक्षरश: वैतागले आहेत. येथे राष्ट्रीयीकृत स्टेट बँक व बॅँक आॅफ बडोदाचे एटीएम जवळपास महिना दीड महिन्यापासून कुलूपबंद असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.सुमारे पंधरा हजारांच्यावर लोकसंख्या असलेले विंचूर गाव आठ ते दहा खेडेगावांचे केंद्रस्थान आहे. परिसरातील गावे व वाड्यांवरील नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी विंचूरला पसंती देतात. असे असतानाही येथे मोठ्या प्रमाणात चलन फिरत असूनही बँकांकडून एटीएम बंद ठेवले जात असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.मनमानीपणाचा जाचविंचूर उपबाजार आवारात दररोज शेकडो वाहनांमधून शेतकरी आपला शेतमाल आणतात. परिणामी येथील आर्थिक व्यवहारात मोठी उलाढाल होत असून, चलन देवाण-घेवाण होत असल्याने चोवीस तास पैसे उपलब्ध करून देणारी सेवा म्हणून बघितल्या जाणाऱ्या एटीएमला मात्र कायम टाळे असल्याने शेतकरीवर्गात असंतोषाचे वातावरण आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील गाव असूनही येथे एटीएमची सुविधा मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खातेदारांची मोठी संख्या आणि आर्थिक उलाढाल असूनही बँकांच्या मनमानीपणाचा जाच सहन करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र