नाशिक : महापालिकेने दिलेल्या कालावधीत नव्या घंटागाड्या रस्त्यावर न आणणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणाऱ्या आरोग्य विभागाने आता सौम्य भूमिका घेतली आहे. १३१ घंटागाड्या उपलब्ध होणे समाधानकारक असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असून, त्यामुळे प्रशासनाची भूमिका का बदलली, असा प्रश्न केला जात आहे.महापालिकेने संपूर्ण शहरासाठी चार ठेकेदारांना घंटागाडीचा ठेका दिला आहे. या ठेकेदारांना महापालिकेच्या निकषाप्रमाणे नवीन घंटागाड्या रस्त्यावर आणाव्या लागणार आहेत. मात्र, २०६ पैकी केवळ १३१ घंटागाड्याच रस्त्यावर आल्या असून, त्यामुळे नव्या घंटागाड्या रस्त्यावर येऊनही अनेक भागांमध्ये घंटागाडीच नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदारांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा देण्यास सुरुवात केली होती, परंतु आता मात्र आरोग्य विभागाकडून वेगळीच बतावणी केली जात आहे.
घंटागाडी ठेकेदारांवर कारवाईस टाळाटाळ
By admin | Published: December 30, 2016 11:53 PM