वणी : शासनाच्या निर्देशानुसार हॉटेल व रेस्टॉरंट सुरु करण्यासाठीच्या निर्णयानुसार नियमांचे पालन करु न व्यावसायिकांनी आपले कामकाज सुरु केले. मात्र अपेक्षित प्रतिसादाअभावी ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागते आहे. वणी व परिसरात शेकडो हॉटेल्स आहेत. तर वणी सापुतारा व वणी कळवण रस्त्यावर काही व्यावसायिक यांनी हा व्यवसाय थाटला आहे. लॉकडाऊन झाल्याच्या सहा महीन्याच्या कालावधीत मोठी आर्थिक हानी व्यवसाय बंद असल्यामुळे झाली. त्यात प्रशासनाच्या मार्गदर्शन नियमनानुसार सुरु झालेल्या व्यवसायास पूर्वपदावर आणण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार असल्याची माहीती हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक विशाल सातपुते यांनी दिली. सध्या टमाटा व कांदा खरेदी विक्र ी व्यवहार उपबाजारात सुरु आहेत. त्यानिमित्ताने स्थानिक व परप्रांतीय व्यापारी यांची वर्दळ वाढली आहे. थोड्या फार प्रमाणात असे व्यावसायिक हॉटेलमधे येतात हायवेलगतच्या हॉटेलचे ग्राहक प्रामुख्याने गुजरात राज्यातील आहेत. मात्र पर्यटनस्थळ, मंदिरे व इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रतिबंध असल्याने असे ग्राहक फिरकेनासे झाले आहे. मोठी गुंतवणुक सहा महीन्यापासुन व्यवसाय बंद मेन्टेनन्स याची जुळवाजुळव करणे अवघड असल्याची प्रतिक्रि या सातपुते यांनी दिली.
हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 3:30 PM
वणी : शासनाच्या निर्देशानुसार हॉटेल व रेस्टॉरंट सुरु करण्यासाठीच्या निर्णयानुसार नियमांचे पालन करु न व्यावसायिकांनी आपले कामकाज सुरु केले. मात्र अपेक्षित प्रतिसादाअभावी ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागते आहे.
ठळक मुद्देस्थानिक व परप्रांतीय व्यापारी यांची वर्दळ वाढली आहे.