शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

वादळात तुटलेल्या विद्युत वाहिन्या दुरुस्तीची प्रतिक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 5:46 PM

निसर्ग चक्रीवादळामुळे शहरातील अनेक ठिकाणी वीजेच खांब वाकले आहेत. तर काही ठिकाणी खांब पडून विद्युत ताराही तुटल्या आहेत. असाच प्रकार सिडकोतील राणा प्रताप चौकात उच्च विद्युत वाहिनीची तार तुटल्याने घडला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरातील नागरिकांना विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीची प्रतिक्षा लागली आहे. 

नाशिक : शहरासह उपनगरांमध्येही अनेक ठिकाणी  निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला असून विविध ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वीज तारांचे मोठ्या नुकसान झाल्याने शहरातील काही भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. परंत, सिडकोतील राणाप्रताप चौकासारख्या परिसरात अद्याप या विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसून परिसरातील नागरिकांना विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीची प्रतिक्षा लागली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे शहरातील अनेक ठिकाणी वीजेच खांब वाकले आहेत. तर काही ठिकाणी खांब पडून विद्युत ताराही तुटल्या आहेत. असाच प्रकार सिडकोतील राणा प्रताप चौकात उच्च विद्युत वाहिनीची तार तुटल्याने घडला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिककमध्ये चक्रीवादळ ३ जूनला धडकल्यानंतर तब्बल  पाच दिवस उलटूनही या विद्युत तारांच्या दुरु स्तीसंदर्भात कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांमध्ये आधीच कोरोनाची भीती होती, त्यात निसर्गचक्र ी वादळामुळे पाऊस व नुकसान यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच विजेच्या तारा तुटत असल्याने भीती वाढत आहे. पावसामुळे वीज प्रवाह थेट रस्त्यात उतरण्याची भीती निर्माण झाली असून सिडकोतील राणा प्रताप चौकात, जैन स्थानकाजवळ उच्चदाबाची वीज तार तुटली. रात्रीच्या वेळी ही तार तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. भर रस्त्यात तार पडल्याने अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. काही जागृत युवकांनी याबाबत रस्ता अडविल्याने अनर्थ टळला. मात्र अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी व मुख्य वीजप्रवाहाची वीज तार तुटल्याने ती तत्काळ दुरु स्त होणे अपेक्षित असताना वीज मंडळाच्या दिरंगाईबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळNashikनाशिकelectricityवीज