सिडको : स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ असलेल्या नाशिक पश्चिम मतदार संघातील महापालीकेचे एकमेव रुग्णालय असलेल्या मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात लोकप्रतिनीधांच्या उदासीनतेमुळे अद्यापही सोनोग्राफी मशीन तसेच गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागाच नसल्याने सिडको व अंबड भागातील सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.चार लाखांहून अधिक लोकसंख्या असणाºया सिडको भागात महापालिकेचे अद्ययावत रुग्णालय नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना याचा आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. सिडको भाग हा स्वतंत्र मतदारसंघ झाल्यानंतरही याठिकाणी मनपाचे अद्ययावत रुग्णालय नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मनपाच्या मोरवाडी येथील स्वामी समर्थ रुग्णालयात महिलांच्या प्रसूतीची सुविधा असलेल्या या रु ग्णालयात सोनोग्राफी मशीनच नसल्याने उपचार घेण्यासाठी महिला रुग्णांना अडचणी येत असल्याची समस्या यावेळी दिसून आली. सिडकोसारख्या या कामगार वसाहतीतील रु ग्णालयात प्रसूतिगृह असतानाही सोनोग्राफीचे मशीन नसल्याने आश्चर्य व्यक्त केले. महिला रुग्णांना सोनोग्राफीसाठी बाहेर खासगी रु ग्णालयात पाठवित असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सर्दी, खोकला, तापसह इतर आजाराचे दरररोज तीनशे ते चारशेरुग्ण रुग्णालयात तपासणीसाठी जातात, परंतु याठिकाणी मनपाकडून अद्यापही सोनोग्राफी मशीनची व्यवस्था करण्यात आलेली नाही.तसेच अतिदक्षता विभागदेखील नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिडको व अंबड भागातील चार लाखांहून अधिक लोकसंख्या असतानाहीरुग्णालयात सुविधा दिल्या जात नसल्याने महापालिकेच्याढिसाळ व नियोजनशून्य कारभाराबाबात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सुविधांचा अभावसिडको हा स्वतंत्र मतदारसंघाचा भाग असून, सुमारे चार लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भागात मनपाचे अद्ययावत रुग्णालय नाही. मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय हे अपुरे पडत असून, मनपाने सिडको व अंबड भागातील सर्वसामान्यांसाठी शंभर खाटांचे अद्ययावत रुग्णालय करणे गरजेचे असून, यासाठी सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांनीदेखील या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
मनपाचे स्वामी समर्थ रुग्णालय सुविधांच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:26 AM