इगतपुरीच्या पूर्व भागात सध्या लग्नसराईची धूम सुरु असून त्या निमित्त जागरण गोंधळाच्या कार्यक्र मांचा जोरदार धडाका सुरु असल्याचे दिसून येत आहे. खंडोबा व देवीच्या जागरण गोंधळाला ग्रामीण भागात विशेष महत्त्व आहे. घरात सुखशांती नांदावी, संसारात अडचणी येऊ नये म्हणून जागरण गोंधळ आयोजित केला जातो. सध्या इगतपुरीच्या पूर्व भागात जागरण गोंधळ आयोजित केला जातो. या निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील विष्णू काजळे यांच्याकडे आयोजित जागरण गोंधळ कार्यक्र मसादर झ ाला. यामध्ये विंचुरी दळवी येथील कलावंतांनी सादर केलेल्या जागरण गोंधळ कार्यक्र माद्वारे संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनापासून वाचण्याचा संदेश दिला. यावेळी नाशिकचे प्रसिद्ध शाहिर रवि वाघमारे यांनी आपल्या खास शाहिरीतून तसेच खंडोबा व देवीचे गाणे गाऊन उपस्थित नागरिकांना कोरोनाविषयी काय उपाययोजना करावयाच्या तसेच याविषयी काय काळजी घ्यायची याबाबतचे मार्गदर्शन करत आयोजित जागरण गोंधळ या कार्यक्र माप्रसंगी जनजागृती केली.---
कोरोनासंदर्भात जागरण गोंधळातून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 1:54 PM
किसन काजळे.= नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्व भागात सध्या लग्नसराईची धूूूम सुरू असून त्या निमित्ताने जागरण गोंधळ कार्यक्र मांचा जोरदार धडाका सुरु असल्याचे दिसून येत आहे. लोककलावंत देखील जागरण गोंधळाच्या माध्यमातूनकोरोनासंदर्भात जनजागृती करीत आहेत. सर्दी,पडसेझाल्यास त्वरीत दवाख्यान्यात जा, हात स्वच्छ धुवा,तोंडाला मास्क लावा. आदि बाबी सांगून शाहीर रवी वाघमारे यांनी ग्रामिण भागातील नागरिकांना करोनासंदर्भात माहिती दिली.
ठळक मुद्दे--संपूर्ण जगभरात कोरोनासारख्या महाराक्षसाने थैमान घातले असून अनेकांचे यामध्ये बळी देखील गेले आहेत.यामुळे आम्ही याआधी देखील आमच्या जागरण गोंधळ या कार्यक्र मांच्या माध्यमातून स्वच्छता, दारु बंदी, स्ञीभृण हत्या, महिला अत्याचार याविषयी जनजागृतीचे काम केले आहे