नाशिक : वर्तमानात मानवतेचं आणि महापुरु षांच्या विचारांचं अवमूल्यन होत आहे. अशा परिस्थितीत आलेल्या ‘भीमक्रांतीचे पडघम’ यासारख्या काव्यसंग्रहामुळे मानवतेचे मूल्यात्मक जागरण घडविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य होणार असल्याचे प्रतिपादन साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे यांनी केले.विद्रोही कवी बुद्धभूषण साळवे संपादित ‘भीमक्रांतीचे पडघम’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने पुस्तक पेठमध्ये आयोजित प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रा. अहिरे बोलत होते. त्या दृष्टीने ‘भीमक्र ांतीचे पडघम’ या संग्रहातील अनेक मान्यवर कवींनी निर्मिलेलं कार्य प्रेरक ठरू शकते. बुद्धभूषण साळवे हे प्रतिभावंतांच्या यादीत समाविष्ट झालेलं एक नाव आहे जे येणाऱ्या काळात इतिहास घडवतील. या प्रकाशनाच्या निमित्ताने कवी किशोर पाठक यांनी विचार मांडले. कवी नंदकिशोर साळवे यांनी मनोगत व्यक्त करून संग्रहातील काही कवितांचे वाचन केले. या संग्रहाचे संपादन करणारे बुद्धभूषण साळवे यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संविधान गायकवाड यांनी, तर आभार किरण निकम यांनी मानले.
‘भीमक्रांतीचे पडघम’द्वारे मानवतेचे जागरण : अहिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 1:02 AM