नाशिकरोड : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय समरगीत गायन स्पर्धेत नाशिकरोडच्या विहितगाव कामगार कल्याण केंद्राने प्रथम क्रमांक पटकावला. सोलापूर येथे आॅगस्टमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. संघात रवि बराथे, राजेंद्र उबाळे, दिनेश निकम, संजय लोळगे, डॉ. बाळकृष्ण शेलार, सुमित्रा पाटोळे, चैताली लोळगे, श्वेता बर्वे, संजीवनी शेलार, सुनील गांगुर्डे, बच्चू सालियन यांनी सहभाग घेतला. सिडकोत कामगार कल्याण भवनात झालेल्या या स्पर्धेत एकूण १२ संस्थांनी सहभाग नोंदवला होता. ओझर व एकलहरे केंद्राला अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. सहायक कामगार कल्याण आयुक्त भावना बच्छाव व अजय हिप्पर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीकांत गायकवाड, सचिन बागुल व रसिका भालेराव यांनी काम पाहिले. महेश विभांडिक यांनी सूत्रसंचालन केले. आभार भरत बोरसे यांनी मानले.याप्रसंगी संदीप चव्हाण, श्रीराम सोनवणे, संदीप पवार, भाग्यश्री हिरे, संध्या अहिरराव, मंजुळा परदेशी, स्वाती भावसार, योगेश पाटील, संतोष सोनवणे आदींसह विविध कामगार कल्याण केंद्रांचे संचालक उपस्थित होते.
कामगार कल्याण मंडळाला पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:45 AM