नाशिक- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३ व्या वर्धापन दिनानिमित्त २०१८ या वर्षातील डॉ. बाबुराव लाखे स्मरणार्थ ‘वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार’ नुकताच महारष्ट्र साहित्य परीषदच्या नाशिकरोड शाखेस पुण्यात एका दिमाखदार सोहळयात प्रदान करण्यात आला. जेष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते सन्मानपत्र व रोख रक्कम आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन शाखेला गौरविण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, इस्त्राईलच्या साहित्यिक नोहा मस्सील, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रभारी कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते. अवघ्या चार वर्षात शाखेने राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन हा सन्मान करऱ्यात आला आहे.
नाशिकरोड शाखेच्या महिला सदस्या कामिनी तनपुरे, सुरेखा गणोरे, सुजाता हिंगे, रेखा पाटील, मंगला सातभाई, संगीता पाटील, वृंदा देशमुख व सुमन हिरे यांनी हा पुरस्कार स्विकारला. महिलांनी पुरस्कार स्विकारण्याच्या संकल्पनेचे प्रभारी कार्यवाह प्रकाश पायगुडे व मिलींद यांनी कौतुक केले. यावेळी शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, कार्यवाह रवींद्र मालुंजकर, कोषाध्यक्ष सुदाम सातभाई तसेच दशरथ लोखंडे व शिवाजी म्हस्के,पांडुरंग चव्हाण, वसंत पाटील, अनिल गुरव, रामचंद्र शिंदे, योगेश कापडणीस आदी उपस्थित होते.