यावेळी बोलताना कुलगुरू प्रा. नितीन करमळकर म्हणाले , हिरे कुटुंबीयांनी आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य तसेच शैक्षणिक, सामाजिक,साहित्यलेखन आणि जलसंपदा नारपारसारख्या क्षेत्रात प्रशांत हिरे यांनी केलेले कार्य आजच्या पिढीसमोर आदर्श निर्माण करणारे असल्याचे सांगितले. तर सत्काराला उत्तर देताना प्रशांत हिरे यांनी, हा सत्कार म्हणजे, हिरे घराण्याच्या संपन्न वारशाचा गौरव असल्याचे सांगितले.
यावेळी विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रांतील सुप्रतिष्ठित व्यक्तींनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.
(फोटो १० हिरे) कॅप्शन- पुणे विद्यापीठात माजी मंत्री डॉ. प्रशांत हिरे यांना 'जीवनसाधना गौरव' पुरस्कार प्रदान करताना पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, कुलगुरू प्रा. नितीन करमळकर, प्र - कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी.