यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते. तत्कालीन सरपंच अंबादास बोडके, उपसरपंच छाया नांगरे, सदस्य संजय नांगरे अलका बोडके, रेखा बोडके, शोभा बोडके, मंदा ठोंबरे, तुषार आंबेकर, लक्ष्मण बोडके, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके, ग्रामसेवक पांडुरंग सोळंके आदींसह ग्रामस्थांनी मेहनत घेतली होती. त्यात वडझिरे गावास सिन्नर तालुक्यातील १० लाखाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला होता.
इन्फो...
उल्लेखनीय कामगिरीची दखल
वडझिरे ग्रामपंचायतीने २०१८-१९ मध्ये स्मार्ट ग्राम स्पर्धेत भाग घेतला होता. ग्रामपंचायतीने गावात केलेली विकसनशील कामे, जिल्हा परिषदेची संपूर्ण संगणकीकृत शाळा व आकर्षक इमारत, हायस्कूलची इमारत, स्वच्छता गृह, विद्यार्थ्यांना सुंदर अभ्यासिका व स्वच्छ ग्राम यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याने हा पुरस्कार मिळाला.
===Photopath===
010221\01nsk_5_01022021_13.jpg
===Caption===
वडझिरे ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते स्वीकारताना माजी सरपंच रेखा बोडके, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके, प्रशासक सदगीर, ग्रामसेवक संदीप देवरे, संजय बोडके, शरद नांगरे.