ठाणगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत १९ गावांचा समावेश असून यात अनेक उपकेंद्रांचा समावेश आहे. ठाणगाव केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. धादवड यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरातील सर्व आशा कार्यकर्त्यांना एकत्र बोलवून कोरोनाबाबत जनजागृती करण्यासंबंधी सूचना केल्या. त्यापध्दतीने सर्व आशा कार्यकर्ता महिला घरोघरी जाऊन कोरोनाबाबत सार्वजनिक ठिकाणी थूंकू नये, वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत. सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे आढळल्यास रुग्णालयाशी संपर्क साधावा अशा सूचना देण्यात येत आहेत. कोरोना या विषाणूंचा प्रादूर्भाव होणार नाही यासाठी ठाणगाव केंद्रासह पंधरा ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. या कार्यशाळेस आरोग्य सेवक एस. जी. काळे, एस. डी. कहांडाळ, नितीन घोटेकर, शारदा शेलार, सुनीता भागवत, शांता शेळके यांच्यासह परिसरातील आशा कार्यकर्ता उपस्थित होत्या.
ठाणगाव आरोग्य केंद्राच्यावतीने कोरोनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 5:48 PM