इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी भरत वेदे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक मुंढे, केंद्रप्रमुख श्रीराम आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक अनिल शिरसाठ, सहशिक्षक अमोल बावा, सविता गोसावी, अतुल आहिरे, निशांत पगार हे नियमित गावातील कुटुंबांना भेटी देणे, कोविडचे सर्वेक्षण करणे, सर्वेक्षणाच्या नोंदी ठेवणे, गावातील ग्रामस्थांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे, गावातील घरांवर, समाजमंदिरांवर पोस्टर्स, बॅनर लावणे, माझे कुटुंब माझी जबाबदारीचे बॅनर रंगविणे, पथनाट्याद्वारे कोरोना आजाराविषयी लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. कोरोनाच्या महामारीमध्ये सामाजिक बांधिलकी जपत शाळेचे मुख्याध्यापक अनिल शिरसाठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील यांच्या माध्यमातून गावातील गरजूंना किराणा व भाजीपाला वाटप केले आहे. कोरोना काळातच आलेल्या दिवाळीमध्ये नाशिकमधील संकेत वारे यांच्यामार्फत साखर, चहा पावडर, डेटाॅल साबण यांचेही वाटप करण्यात आले.
इन्फो
गावकऱ्यांना मदतीचा हात
काही दिवसांपूर्वी गोदावरी सामाजिक संस्था नाशिक यांनी जामुंडे गावातील गरजू लोकांना कपड्यांचे वाटप केले. नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते महेश शिरसाठ यांनीदेखील येथील ग्रामस्थांसाठी कपड्यांची मदत केली आहे. ग्रामपंचायत मानवेढेकडून येथील शिक्षकांनी शाळेला थर्मल गन, सॅनिटायझर स्टॅन्ड, सॅनिटायझर, मास्क आदी कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य मिळविले आहे, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या प्रयत्नातून गावकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आला.
फोटो- २४ जामुंडे स्कूल
===Photopath===
240421\24nsk_25_24042021_13.jpg
===Caption===
फोटो- २४ जामुंडे स्कूल