देवळाली कॅम्प : महिला सुरक्षा आणि सुरक्षितता यावर येथील निर्भया पथकाच्या युनिट चारकडून नूतन विद्यामंदिर परिसरात शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येऊन निर्भयाबाबत माहिती देण्यात आली.महिला, तरुणी, शालेय विद्यार्थिनींवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी शहर पोलिसांनी निर्भया पथक सुरू केले आहे. आतापर्यंत देवळालीतील निर्भया पथकातील पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, हवालदार भास्कर कडाळे, सुधीर काकड, स्वाती फड, कल्पना बैरागी आदींनी खंडेराव टेकडीसहविविध भागांत कारवाई आणि जनजागृती अशी दुहेरी भूमिका पार पाडली आहे.याबाबत बोलताना निर्भया पथकाच्या पीएसआय वैशाली मुकणे यांनी सांगितले, निर्भया पथकाने वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजेसमधील १५ हजार विद्यार्थिनींना आजपावेतो मार्गदर्शन केले आहे. यामध्ये मुलींची स्वसुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असून, मुलींना त्याबाबत अवगत करण्यात आले आहे.याशिवाय विविध भागांत जोडप्याने फिरणाऱ्या मुली व मुलांची समजूत काढून त्यांना घरी अथवा त्यांच्या संपर्क क्रमांक घेऊन सोडून देण्यात येत असते. निर्भया पथकाकडून मार्गदर्शन करण्याबरोबरच माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. टवाळखोरांबाबत अथवा छेडछाडीच्या घटनांबाबत माहिती द्यायची असल्यास नागरिकांनी १०९१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही पथकाकडून करण्यात आले आहे.धोका असा ओळखामुलींच्या वयोगटानुसार त्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून, १२ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलींना चांगला आणि वाईट स्पर्श समजावून सांगितला जातो तसेच असा अनुभव असल्यास पालकांना त्याची कशी कल्पना द्यावी, त्याचबरोबर १४ ते १६ आणि १६ ते १८ या वयोगटांतील मुलींना आमिषांबाबत आणि त्यातून निर्माण होणाºया धोक्यांबाबत माहिती देण्यात आली.
निर्भया पथकाकडून जागरूकता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:49 AM