घोटी : राम जन्मभूमीचे मंदिर निर्माण अभियान घोटी येथील वसतिगृहात राबविण्यात आले. महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष अभियान म्हणून घोटी येथील महिलांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला.
या अभियानात रामायणाच्या आधारावर पन्नास प्रश्न व रामजन्मभूमीची माहिती अशी प्रश्नमंजुषा तयार करण्यात आली होती. घोटीतील सुमारे दोनशे महिलांनी या अभियानात सहभाग घेतला. यावेळी जमलेल्या महिलांसमोर या अभियानाची माहिती विनित महाजन व हेरंब गोविलकर यांनी विषद केली.
प्रश्नमंजुषा कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या विजयी महिलांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक वाटप करण्यात आले.या स्पर्धेत प्रथम पुरस्कार विद्या जाधव, द्वितीय पुरस्कार काजल भगत तर तृतीय पुरस्कार सरोज डायमा यांनी पटकावला तर पुरस्कार्थी म्हणून दीपा परदेशी, बेबी राखेचा व सोनाली इंदानीया यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अलका जाधव, जया किर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू महिला परिषदेच्यावतीने वैशाली गोसावी, पल्लवी शिंदे, दीपा राय, पूनम राखेचा, सुनीता सिंघल, कीर्ती अग्रवाल, अलका गोरे, किरण मोदी, पौर्णिमा गायकवाड यांनी केले होते.घोटी येथे प्रश्नमंजुषा कार्यक्रमात विजयी महिलांसमवेत अलका जाधव, जया किर्वे, वैशाली गोसावी, पल्लवी शिंदे आदी उपस्थित होते.