नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशन व इंडियन असोसिएशन फॉर पेरेंटरल अँड एंटरल न्यूट्रिशियन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर’निमित्त पौष्टिक आहाराविषयी जनजागृती हा कार्यक्रम रविवारी (दि.२९) आयएमए हॉल, शालिमार येथे पार पडला. जागतिक हृदयदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात आपले बजेट सांभाळून निरोगी आहार कसा घ्यावा यावर मागदर्शन करण्यात आले. यावेळी आपल्या धावपळीच्या जीवनात आपण आहराकडे दुर्लक्ष करत असून, याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असल्यामुळे आजारांना आयते आमंत्रण मिळत असते. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात आहार किती महत्त्वाचा आहे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच निकृष्ट आहारामुळे अतिसार हा आजार बळावत असतो. त्यामुळे पौष्टिक व्यवस्थापन कसे करता येईल तसेच उत्तम आरोग्यासाठी व्यक्तिगत स्वच्छतेचे महत्त्व या विषयांवर डॉ. राजश्री पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. सागर भालेराव तसेच आहार तज्ज्ञ हिमानी पुरी, मयुरी सहस्त्रबुद्धे, रिष्टी मेहता, सकिना सागोरवाला, मंजिरी जोशी यांनी मार्गदर्शन यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्र मास प्रमुख अतिथी म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनील दुसाने, अजय फडोळ तसेच ए. पी. आयचे अध्यक्ष डॉ. विनोद विजन व आय. एम. ए. सचिव डॉ. विशाल गुंजाळ हे उपस्थित होते. कार्यक्र माचे नियोजन आय.ए.पी.ई.एन.चे संचालक सुदाम पेंढारे यांनी केले.
पौष्टिक आहाराविषयी ‘आयएमए’ची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:12 AM