कोरोना योद्ध्यांनी कोरोनाला घाबरून न जाता, कोरोना पासून बचावासाठी, मास्क वापरा, हात धुवा आणि सामाजिक अंतर बाळगा, याबद्दल जनजागृती केली, तसेच रविवारी १७ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आयोजित केलेली आहे. या दिवशी सर्वांनी आपल्या ० दिवस ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजावे, असे आवाहन करण्यात आले. सध्याचे पल्स पोलिओ लसीकरण करण्याच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने लसीकरण सत्रांच्या ठिकाणी कोरोनाबाबतची सर्व काळजी घेणे अत्यावश्यक आहे. आरोग्य विभाग, निफाड तालुका पंचायत समिती, निफाड यांच्या कोरोना योद्ध्यांच्या सदर पथकांमध्ये माजी तालुका आरोग्य अधिकारी तथा संपर्क अधिकारी डॉ.चेतन काळे, तालुका नोडल अधिकारी डॉ.योगेश शिंदे, डॉ.वैभव पाटील, दिलीप बोदडे, प्रदीप पवार, गजानन जयतकर, गोरक्षनाथ गाढवे, कोंडीराम बनगर, सुरेश सोनवणे उपस्थित होते.
कळसुबाईच्या शिखरावर मास्क, लसीकरणाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 8:17 PM