शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

साडेचार हजार मतदान केंद्रांमध्ये जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 11:17 PM

नाशिक : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनांनंतर निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले असून, जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविली आहे. जिल्ह्यातील ४,५७९ मतदान केंद्रांमध्ये सदर मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेतून सुमारे १ लाख ३४ हजार मतदारांनी प्रत्यक्ष जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला आहे.

ठळक मुद्देनिवडणूक शाखा : दीड लाख मतदारांचा मतदार जनजागृती मोहिमेत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनांनंतर निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले असून, जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविली आहे. जिल्ह्यातील ४,५७९ मतदान केंद्रांमध्ये सदर मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेतून सुमारे १ लाख ३४ हजार मतदारांनी प्रत्यक्ष जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला आहे.निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संपूर्ण जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात जनजागृतीचे नियोजन करण्यात आले होते. या मोहिमेत प्रत्येक वयोगटातील मतदारांचा सहभाग नोंदविण्यात आला. शिवाय जनजागृतीसाठी शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांमध्येदेखील जनजागृती करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून जनजागृती मोहीम राबविण्यात येऊन प्रत्यक्ष मतदारांचा सहभाग नोंदविण्यात आला आहे.जिल्ह्यातील ४५७९ मतदान केंद्रांवर १३० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती प्रात्यक्षिक मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेसाठी प्रत्येकी ३० बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात आला आहे.या मोहिमेत १,३४,०१० मतदारांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला असून १,०९,५९८ मतदारांनी मतदानाच्या प्रात्यक्षिकात सहभाग घेतला आहे.लोकसभा निवडणुकीकरिता मूळ मतदान केंद्र ४,४४६ आणि २७४ सहाय्यकारी केंद्रे असे एकूण ४७२० मतदान केंद्रांवर निवडणूक घेण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता १५०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांसाठीच सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्याबाबत निर्देश आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीकरिता मतदान केंद्रांची संख्या ही लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी राहणार आहे.साधारणत: १५० एवढे सहाय्यकारी मतदान केंद्रे विधानसभेसाठी तयार करण्यात येणार आहेत. एकूण मतदान केंद्रे साधारणत: ४,५९६ इतके राहणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी ज्या मतदान केंद्रावर मतदान केले शक्यतो त्याच मतदान केंद्रावर विधानसभेसाठी मतदान घेण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत काही मतदान केंद्रांमध्ये बदल होऊ शकतात.२७४ सहाय्यकारी केंद्रलोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता मूळ मतदान केंद्र ४,४४६ आणि २७४ इतके सहायकारी मतदान केंद्रे असे एकूण ४,७२० मतदान केंद्रांवर निवडणूक घेण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता १५०० पेक्षा जास्त मतदार असलेल मतदान केंद्रांसाठीच सहायकारी मतदान केंद्र तयार करण्याबाबत निर्देश प्राप्त असल्यामुळे जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता मतदान केंद्रांची संख्या ही लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी राहणार आहे. एकूण १३३ सहाय्यकारी मतदान केंद्रे विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आले असून, सदर प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे. जिल्ह्यात मूळ मतदान केंद्र ४,४४६ आणि १३३ इतके सहाय्यकारी मतदान केंद्रे, असे एकूण ४५७९ एव्हढी मतदान केंद्रे आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक