विभागीय प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, सिन्नर नगरपरिषद वैद्यकीय अधिकारी, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. निर्मला गायकवाड, डॉ. लहू पाटील रॅलीच्या अग्रभागी होते. पीपीई किट परिधान केलेले दोन कोरोना योध्दे, रु ग्णवाहिका आण िपोलीस वाहन यांचा रॅलीत समावेश होता. यावेळी घरीच राहा, सुरक्षित राहा, एकजूटीचे दाखवू बळ, कोरोना काढेल पळ, कोरोना हारेल, देश जिंकेल, आया है कोरोना, इससे मत डरना, पोलिसांना सहकार्य करा, पोलीस आहेत मित्र, कोरोनाशी लढू एकत्र, गो कोरोना गो, अशा घोषणा देत जनजागृती करण्यात आली. सिन्नर नगर परिषद येथील हुतात्मा चौक येथून रॅलीस प्रारंभ झाला. कुंभार भट्टी, गंगावेस, चांडक चौक, लाल चौक, नाशिक वेस, खासदार पुल, भैरवनाथ मंदिर, नवीन पुल, लोकनेते वाजे विद्यालय, बसस्थानक, नेहरू चौक, गणेश पेठ, छत्रपती शिवाजी चौक, तानाजी चौक, कालभैरवनाथ मंदिर, वावी वेस, पिंपरी नाका मार्गे रॅली हुतात्मा चौक येथे राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. यावेळी आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, ताहीर शेख, दीपक पगारे, राकेश शिंदे, विष्णू हाडके, विजय वाजे, भीमराव संसारे, भूषण नवाल, कट्यारे, सौरभ गायकवाड, प्रवीण भोळे, घोरपडे आदींसह आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, यांनी सहभाग घेतला होता.
सिन्नरला कोविड योद्धयांची जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 6:30 PM