सर्वितर्थ टाकेद : संत निरंकारी मंडळ शाखा घोटीच्या वतीने एस. टी. बस स्थानक ते रामराव नगर पर्यंत घोटी शहरातून मुख्य महात्मा सुधाकर दुरगुडे संचालक पंडित डहाळे, शिक्षक राम भटाटे, महिला प्रमुख आनंदी शिद, दशरथ उंबरे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. यावेळी घोटी व परीसरातील गावोगावच्या सत्संगा मधील शेकडो भाविक सहभागी झाले होते.संत निरंकारी मंडळाचे वतीने पुढील आठवड्यात नाशिक येथे होणाऱ्या भव्य दिव्य संत निरंकारी समागमाच्या जनजागृतीसाठी घोटी शाखेअंतर्गत येणाºया गावोगावच्या संत व भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.नाशिक येथील म्हसरु ळ जवळील बोरगड मधील सुमारे पावणे चारशे एकर जागेत सद्गुरु सुदिक्षा माताजींच्या कृपाशिर्वादाने व त्यांच्या उपस्थितीत हा संत निरंकारी मंडळाचा भव्य असा ५३ वा संत निरंकारी समागम दि २४ ते २६ जानेवारी २०२० रोजी होत आहे.ईगतपुरी तालुक्यातील घोटी, ईगतपुरी व शिरेवाडी या तीन शाखांपैकी घोटी शाखेतील मोगरेचे प्रबंधक दत्तू नाडेकर, खडकवाडीचे गुलाब कडू, घोटीचे शिवाजी बारगजे, सोमजचे कृष्णा कुंदे, गरुडेश्वरचे तानाजी वारघडे, वैतरणाचे वाळू पारधी, गांगडवाडीचे सोनू गांगड, उभाडेवाडीचे गोरख गांगड, उभाडेचे किसन उंबरे, उंबरकोणचे सुकदेव सारूक्ते, बळवंतवाडीचे लक्ष्मण लोटे, भरवजचे शशिकांत मेमाणे, दरेवाडीचे बाळू गावंडा, काळूस्तेचे शिवराम घारे, खैरगावचे सोमनाथ फोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व दिलीप तोकडे, माजी उपसरपंच संतोष दगडे, राजू लंगडे, गजानन दुरगुडे, ज्ञानेश्वर कडू, दशरथ उंबरे, नंदू रु पवते, दत्ता सोनवणे, गोपीनाथ रु पवते, विशाल गोडे, ठाकरे, निकम व शिवमल्हार मित्र मंडळ यांच्या सहकार्याने पारंपरिक पोशाख, परिधशन केलेले छोटे संत व न्यू इंग्लिश स्कूल काळूस्तेचे लेझीम पथकाच्या तालात व जय घोषात रॅली द्वारे जनजागृती करण्यात आली.
संत निरंकारी समागमसाठी रॅलीद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 5:48 PM
सर्वितर्थ टाकेद : संत निरंकारी मंडळ शाखा घोटीच्या वतीने एस. टी. बस स्थानक ते रामराव नगर पर्यंत घोटी शहरातून मुख्य महात्मा सुधाकर दुरगुडे संचालक पंडित डहाळे, शिक्षक राम भटाटे, महिला प्रमुख आनंदी शिद, दशरथ उंबरे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. यावेळी घोटी व परीसरातील गावोगावच्या सत्संगा मधील शेकडो भाविक सहभागी झाले होते.
ठळक मुद्देघोटी : युवक युवतींसह गावोगावच्या भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग