दिंडोरी (नाशिक)- तालुक्यात मागील आठवड्यांत वादळीवा-यांसह पडलेला पाऊस व गारपीटमुळे द्राक्ष, गहू, कादां उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्यांमुळे अनेक शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून वर्षभर शेतात कष्ट करून अवकाळी व गारपीटीमुळे क्षणात पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी द्राक्षबागा तोडण्यात आल्या. प्रशासनाने पिकांचे पंचनामे केले मात्र या नुकसानगस्त शेतक-यांना शासनाची मदत कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रत्येक वर्षी पडणारा अवकाळी पाऊस, गारपीट यांमुळे द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे कंबरडे मोडले असून खर्च होणारे भांडवलसुध्दा निघत नाही. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील बहुसंख्य द्राक्ष उत्पादकांनी द्राक्षबागांना कुऱ्हाड मारली आहे. सतत दोन वर्ष कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे द्राक्ष उत्पादकांचे ऐवढे हाल झाले की, पाच ते दहा रुपये प्रतिकिलोने द्राक्ष विकावी लागली तर काही द्राक्ष उत्पादकानी द्राक्ष बांधावर खुडून टाकली. त्यांत कोरोना संसर्गमुळे मजुरांनी घरी राहणे पंसद केल्यामुळे मजुरांची तीव्र स्वरूपाची टंचाई निर्माण होऊन द्राक्षबागा वेळेस खाली झाल्या नाही.
परिणामी द्राक्षवेलीला विश्रांतीचा कालावधी मिळाला नाही. त्यांमुळे द्राक्षवेली अशक्त झाल्या. अनेक द्राक्षबागां मालाविना उभ्या राहिल्यां व ज्या द्राक्षबागाना घड निघाले त्या बागाना पुन्हा फ्लोरिंग आवस्थेत अवळाळी पावसाने झोडपल्यांमुळे गळ व कुज झाल्यांमुळे पुन्हा द्राक्ष उत्पादकाचे मोठे नुकसान झाले. ज्या बागा अवकाळीतून वाचल्या त्यांना चालू महिन्यांत झालेल्या वादळीवाऱ्यांसह पडलेल्यां अवकाळी पाऊस व गारपीटीचा मोठा फटका बसल्यांमुळे शेतकरी राजा संपूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
पडलेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा उत्पादकाचेही नुकसान होऊन विविध रोगाचा उत्पादक सामना करित आहे. या अवकाळीमुळे कादां पिक पिवळे पडले असून काद्यांची वाढ खुंटली आहे. अनेक रासायनिक औषधाच्या फवारण्या सध्या कांदा उत्पादक घेत आहे तर दुसरीकडे सोंगणीला आलेला गहू, हरबरा पिकांचे नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी गारपीटीनंतर त्वरित सोंगणीला सुरवात केली असून गहू, हरभरा पिकांनाहि नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा शेतकरी वर्गाला प्रत्येक वर्षी फटका बसत असल्यामुळे शेतकरी वर्गापुढे शेती करावी की, नाही असा प्रश्न पडला आहे. या नैसर्गिक आपत्ती व पडलेल्या बाजार भावामुळे बळीराजा दिवसोदिवस कर्जबाजारी झाला असून शेती व्यवसाय एका धोक्याच्या वळणावर येवून उभा आहे .
एकीकडे शेतक-यांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे उत्पादन खर्च, रासायनिक खते, रासायनिक औषधे यांचा वाढलेले बाजार भाव त्या तुलनेत पिकांना भाव मिळत नाही परिणामी बळीराजा कर्जबाजारी होत आहे. वारंवार वातावरणात होणारे बदल त्यांमुळे उत्पादन खर्चात झालेली प्रंचड वाढ, नैसर्गिक आपत्ती यांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. परिणामी आम्ही सहा एकर द्राक्षबागेवर गारपीटीनंतर लगेच तिसऱ्या दिवशी कु-हाड लावली आहे.पडलेल्या भावमुळे द्राक्षबाग पोसणे परवडण्यासारखे नाही म्हणून कर्जबाजारी होण्यापेक्षा द्राक्षबाग तोडणे योग्य आहे - योगेश मालसाने, नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक निगडोंळ
इतर पिकांचे भांडवल द्राक्ष पिकाला खर्च करून योग्य बाजारभाव मिळत नाही. नैसर्गिक आपत्ती, वाढलेली मजुरी, वाढलेल्या रासायनिक खते व औषधाच्या किंमती, यामुळे उत्पादन खर्च वसुल होत नाही. परिणाम सतत कर्जबाजारीपणा वाढत आहे त्यामुळे आम्ही चार एकर द्राक्षबागेला कुऱ्हाड लावण्याचा निर्णय घेतला आहे-राहूल जाधव, शेतकरी करंजवण