दिंडोरी : रेशनकार्ड, वनजमिनी आदींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालसमोर सोमवारपासून (दि.२४) बिºहाड आंदोलन सुरू झाले आहे. शेकडो कष्टकरी आदोलक मुलाबाळांसह तहसील आवारात बिर्हाडसह दाखल झाले. यावेळी विविध मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तहसील आवारातच ठिय्या देण्याचा निर्धार करण्यात आले. आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत तहसील कार्यालयात बैठक बोलावली. यावेळी विविध प्रश्न सोडविण्याबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. प्रांताधिकारी डॉ. आहेर यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलक निर्णयावर ठाम होते. यावेळी गटविकास अधिकारी भावसार, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, वनाधिकारी गणेश गांगोडे, किसान सभेचे सुनील मालुसरे, तालुकाध्यक्ष रमेश चौधरी,आप्पा वाटाणे, लक्ष्मीबाई काळे आदींसह किसान सभेचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिल बोरसे, वणीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी बंदोबस्त ठेवला आहे.दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नवीन रेशनकार्ड, विभक्त रेशनकार्ड लाभधारकांना दिले गेले नाही. तसेच किसान सभेच्या मुंबई पायी मोर्चाच्या माध्यमातून वयोवृद्ध व विधवा यांना ६०० रुपयांवरून १००० रु पये पेन्शन देण्याचे मान्य केले. मात्र दिंडोरी तालुक्यातील अनेक लोकांना ६०० रूपयेच दिले जातात. अनेक वर्षांपासून दिंडोरी तालुक्यात वन जमिनी व गायरान जमिनी कसत आहेत. परंतु सरकारच्या नवीन धोरणानुसार अनेकांना त्यापासून वंचित ठेवले जात आहे त्यांना सामावून घ्यावे आदी विविध मागण्या मान्य होईपर्यंत बिन्हाड मोर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
दिंडोरीत किसान सभेचे बिºहाड आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:56 PM
रेशनकार्ड, वनजमिनी आदींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालसमोर सोमवारपासून (दि.२४) बिºहाड आंदोलन सुरू झाले आहे. शेकडो कष्टकरी आदोलक मुलाबाळांसह तहसील आवारात बिर्हाडसह दाखल झाले.
ठळक मुद्देप्रलंबित मागण्या : तहसीलसमोर ठिय्या; घोषणांनी परिसर दणाणला