मालेगाव : येथील राष्टÑीय एकात्मता चौकात राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास हेतुपुरस्सररीत्या टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे नेते देवराज गरुड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. एकात्मता चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हेतुपुरस्सररीत्या उभारला जात नाही. त्यामुळे तत्कालीन प्रशासकीय अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्याची राज्य शासनाने परवानगी द्यावी. सदर जागेवर पुतळा बसविण्याचा महापालिकेच्या महासभेचा ठराव क्रमांक ३९५ हा गेल्या २० डिसेंबर रोजी पारित करण्यात आला आहे. राष्टÑीय महापुरुषांचे पुतळे सार्वजनिक जागांवर बसविण्यासाठी शासनाच्या अटी व शर्ती पूर्ण करून शासकीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक शिफारस राज्य शासनाकडे केली आहे. तरीदेखील मनपाची प्रशासकीय यंत्रणा पाठपुरावा करीत नाही. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. सदर जागेवर तातडीने पुतळा उभारावा, अशी मागणी गरुड यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत दिलीप शेजवळ, शांताराम सोनवणे, नितीन गरुड, शशिकांत पवार, वाल्मीक त्रिभुवन, राजेश पटाईत, मुकेश खैरनार, सोमनाथ मोरे, मनीष खेडकर आदी उपस्थित होते.
बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:30 PM
मालेगाव : राष्टÑीय एकात्मता चौकात डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे देवराज गरुड यांनी केला.
ठळक मुद्देमहापालिकेच्या महासभेचा ठराव यंत्रणा पाठपुरावा करीत नाही