नाशिक : बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात असतानाच शासनाने आता मातांना बालसंगोपनासाठी साक्षर करण्यासाठी ‘बेबी केअर किट’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये अशाप्रकारचे किट मातांना दिले जात असल्याने या राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने महाराष्टÑातही सदर योजनेंतर्गत मातांना किट दिले जाणार आहे.या संदर्भात जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण अर्पणा खोसकर यांनी सांगितले की, महाराष्टÑात सर्वसाधारणपणे २० लाख महिल वर्षाला प्रसूत होत असतात. त्यापैकी १२ लाख माता आदिवासी, ग्रामीण भागात प्रसूत होतात. प्रसूतीनंतर जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मातांना ‘बेबी केअर किट’उपलब्ध करून दिले जाणार आहे. येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र सरकारद्वारा पुरस्कृत ही योजना असून, शून्य ते ६ वर्षे वयोगटांतील मुलांच्या विकासाकडे लक्ष देण्याच्यादृष्टीने या उपक्रमात विविध उपक्रम राबविले जातात. त्यानुसार बालमृत्यू रोखण्यसाठी मातांना साक्षर करण्याच्या हेतूने मातांना किट दिले जाणार आहे. बालमृत्यूस अनेक घटक कारणीभूत आहेत. परंतु मातांना बालसंगोपनाचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे बालकांचे पुरेसे आणि अपेक्षित असे संगोपन होत नाही. त्यामुळेच आता मातांना साक्षर करण्यात येणार असून स्वच्छता, स्वच्छ पाणी, संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध, लसीकरण, रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे, आदिंची माहिती या किटच्या माध्यमातून मातांना मिळणार आहे.कीटमध्ये असे असेल साहित्य१) लहान मुलांचे कपडे, २) प्लॅस्टिक लंगोट, ३) झोपण्यासाठी लहान गादी, ४) लहान टॉवेल, ५) तापमापन यंत्र म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स थर्मामीटर, ६) बालकांच्या अंगाला लावण्याचे तेल, ७) मच्छरदाणी, ८) एक लहान ब्लॅँकेट, ९) लहान चटई, १०) लहान मुलांचा शाम्पू, ११) लहान मुलांची खेळणी, १२) लहान नेलकटर, १३) हातमोजे,पायमोजे, १४) मातांना हात धुण्यासाठी लिक्विड, १५) बालकांना गुंडाळण्यासाठी लोकरीचे कापड, १६) बॉडी वॉश लिक्वीड, १७) सर्व साहित्यांची लहान बॅग.बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी विकसित राज्ये अशाप्रकारच्या उपायायोजना करीत असून देशात आंध्र प्रदेश, तामिळनाडू, व तेलंगाणा ही राज्य नवजात बालकांना बेबी केअर किट उपलब्ध करून देत आहे. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रे, शासकीय रुग्णालये येथे प्रसूत होणाºया मातांना मोफत बेबी कीट दिले जाणार आहे. बेबी केअर कीट बॅगची मागणी केल्यानंतर बालविकास प्रकल्पाधिकारी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तीन दिवसांत बेबी केअर कीट उपलब्ध करून देतीतल. ही योजना सर्व प्रवर्गातील महिलांसाठी असल्याची माहिती सभापती खोसकर यांनी दिली.
नवजात बालकांसाठी मातांना मिळणार ‘बेबी केअर किट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 12:52 AM
बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात असतानाच शासनाने आता मातांना बालसंगोपनासाठी साक्षर करण्यासाठी ‘बेबी केअर किट’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये अशाप्रकारचे किट मातांना दिले जात असल्याने या राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने महाराष्टÑातही सदर योजनेंतर्गत मातांना किट दिले जाणार आहे.
ठळक मुद्देएकात्मिक बालविकास : केंद्र पुरस्कृत योजना